Good diet | नव्या वर्षात आजारी पडायचं नाही, तर या सवयी लावून घ्या

सध्याचे जीवन हे अतिशय धकाधकीचे झाले आहे. आजारापासून दूर राहायचे असेल तर जीवनशैलीत बदल घडवून आणावा लागेल. दिनचर्येत काही बदल करावा लागेल. खालील उपाय केले तर तुम्ही आजारी पडणार नाहीत.

Good diet | नव्या वर्षात आजारी पडायचं नाही, तर या सवयी लावून घ्या
HEALTH
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 4:52 PM

नवीन वर्षांत काही संकल्प केले असतील. आजारांपासून दूर राहायचे असेल तर काही सवयी लावून घ्याव्या लागतील. आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणावा लागेल. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलून आरोग्यसंपन्न राहू शकता.

अशी करा दिवसाची सुरुवात

उशिरापर्यंत झोपणे वाईट सवय आहे. म्हणून सकाळी उठण्याची सवय लावा. आरोग्यसंपन्न राहण्यासाठी दिवसाची सुरुवात एखादं फळ खाऊन करा. एकवीस दिवसांत तुम्हाला याची सवय लागेल. रात्री नऊ वाजतापूर्वी जेवण करा. जेवणानंतर अर्धा तास हळूहळू चाला.

दिवसभराचा आहार

नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे जेवण याचा प्लान तयार करा. नाश्ता आणि दुपारचे जेवण चांगले घेऊ शकता. परंतु, रात्री सहज पचन होईल, असे जेवण करा. आपल्या आहारात प्रोटीन, कॅल्शियम आणि फायबरसारखे पोषक तत्त्व असणारे अन्न घ्या.

योग्य वस्तूंचे सेवन करा

ताज्या, ऋतुनुसार होणारा आणि घरी बनविलेला आहार जास्त पौष्टिक असतो. म्हणून ऋतुनुसार खाण्याच्या वस्तू निवडा. ताज्या वस्तू खा. घरी बनलेल्या वस्तू खाण्याची सवय लावा. सगळे आजार दूर पळतील. हिरवा भाजीपाला भरपूर प्रमाणात सेवन करा. त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन, झिंक, न्यूट्रीएंट्स असतात. हे आपल्याला आरोग्यसंपन्न राहण्यासाठी मदत करतात.

सुदृश मन

आरोग्यसंपन्न राहण्यासाठी मनाचं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. सहा-ते आठ तास झोप घ्या. तुमचा मेंदू योग्य पद्धतीनं काम करेल. तणावरहीत राहालं. चांगली पुस्तकं वाचा, संगीत ऐका आणि वेळ काढून फिरायला जा.

पाणी भरपूर प्या

पाणी चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एक पुरुषानं रोज जवळपास साडेतीन लीटर पाणी घेतले पाहिजे. तर महिलेनं तीन लीटर पाणी घेतले पाहिजे. पाणी आपल्या शरीरातील विषारी तत्व शरीराच्या बाहेर काढतात.

वर्कआऊट करा

तुम्हाला रोज व्यायाम करण्याची सवय लावली पाहिजे. यासाठी जीम किंवा फिटनेस सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही. घरी राहूनही तुम्ही व्यायाम करू शकता. आठवड्यातील पाच दिवस रोज ४५ मिनिटे वर्कआउट केल्यास तुम्ही फिट राहाल.

जंक फूड

बाहेरचे तळलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नये. जास्त साखर किंवा मिठाचे पदार्थ टाळले पाहिजे. जंक फूड तर अजिबात खाऊ नये. ते तब्येतीवर वाईट परिणाम करतात.

वारंवार हात धुवा

कोरोनाकाळात हे जास्त प्रचिलीत झाले. कारण हाताने आपण जेवण करतो. हातावर जंतू आल्यास ते सरळ आपल्या पोटात जातात. त्यामुळं वारंवार हात धुणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय चांगली संगत आपण ठेवली पाहिजे.

Winter Superfoods : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या सुपरफूड्सचा आहारात समावेश करा

Health Care Tips | वयाच्या 30 नंतर फिट राहायचे असेल तर करा ही योगासने

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.