हिवाळ्यात आंबे हळद आणि गूळ खाल्ल्यास आरोग्याशी संबंधित 5 समस्या होतील दूर

हिवाळ्याच्या हंगामात बाजारपेठत हंगामी भाज्या आणि फळं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. यापैकी एक म्हणजे कच्ची हळद थंडीच्या दिवसात अनेक घरात स्वयंपाकात वापरली जाते. तर काही लोकांना भाजी म्हणून तर काहींना हळद दुधात मिसळून खायला आवडते, परंतु तुम्हाला माहित आहे का कच्ची हळद आणि गूळ एकत्र खाणे तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? नसेल तर जाणून घ्या.

हिवाळ्यात आंबे हळद आणि गूळ खाल्ल्यास आरोग्याशी संबंधित 5 समस्या होतील दूर
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 3:54 PM

थंडीच्या दिवसात प्रत्येकजण एक कप चहा किंवा कॉफी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. परंतु तुम्हाला माहित आहे का तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी सकाळी उठल्यावर या गोष्टींचे सेवन देखील तुम्हाला फायदेशीर आहे. तर काही लोकं हिवाळ्यात शरीर डिटॉक्स ठेवण्यासाठी हर्बल पेय घेत असतात. अशातच आम्ही तुम्हाला आज अशा काही पारंपरिक आणि हळदीयुक्त असलेल्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ते म्हणजे रोज सकाळी कच्ची हळद आणि त्या सोबत गुळाचे सेवन करणे.

विशेषत: हिवाळ्यात या दोन गोष्टींचे मिश्रण शरीराला आतून उबदार आणि पोषक ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. या दोन्ही गोष्टी हिवाळ्यातील सुपरफूडमध्ये गणल्या जातात. चला, या लेखात जाणून घेऊया रोज कच्ची हळद आणि गूळ एकत्र करून खाल्ल्याने आरोग्यास कोणते फायदे होतात.

कच्ची हळद आणि गूळ खाण्याचे फायदे

रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनते

कच्च्या हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. हे सर्दी, खोकला, फ्लू इत्यादी आजारांशी लढण्यास मदत करते. तर गुळामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील आढळतात जे शरीराला रोगांपासून वाचवतात.

हे सुद्धा वाचा

पचनसंस्था निरोगी ठेवते

कच्ची हळद आणि गूळ हे दोन्ही पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहेत. कच्ची हळद पाचक एंजाइम सक्रिय करते, ज्यामुळे अन्न पचणे सोपे होते. गुळामुळे पचनशक्ती तर सुधारतेच पण बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.

जळजळ कमी करते

कच्च्या हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. यामुळे संधिवात, सांधेदुखी आणि स्नायूदुखणे यांसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

रक्त स्वच्छ करण्यास उपयुक्त

गूळ रक्त शुद्ध करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि रक्त शुद्ध करते. कच्ची हळद रक्त पातळ करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

ऊर्जेची पातळी वाढवा

गुळामध्ये नैसर्गिक साखर आढळते ज्यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते. हिवाळ्यात जेव्हा आपल्याला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो तेव्हा गुळाचे सेवन केल्याने एनर्जी लेव्हल वाढते आणि कच्च्या हळदीसोबत गुळ मिसळल्यास फायदेही दुप्पट होतात.

कच्ची हळद आणि गूळ कसा खावा?

आहारात कच्ची हळद आणि गुळाचा समावेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. हे दोन्ही मिसळून तुम्ही चहा बनवू शकता किंवा दहीसोबत सेवन करू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या दोघांना पाण्यात उकळून पिऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.