Constipation Ayurvedic Tips : पोट साफ होत नाहीये ? मग हे आयुर्वेदिक उपाय जरूर करा, बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम
बद्धकोष्ठतेच्या काही संभाव्य कारणांमध्ये डिहायड्रेशन किंवा खूप कमी फायबर असलेले पदार्थ खाणे यांचा समावेश असू शकतो. पण त्याची काळजी करण्याची गरज नाही. काही आयुर्वेदिक उपायांच्या मदतीने तुम्हाला आराम मिळू शकतो.
नवी दिल्ली : कॉन्स्टिपेशन ज्याला आपण मराठीमध्ये बद्धकोष्ठता (constipation) म्हणतो. जेव्हा तुम्हाला शौचाला अडचण येते तेव्हा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, असे म्हणतात. यामुळे जास्त ताण येऊ शकतो आणि टॉयलेटमध्ये जास्त वेळ घालवूनही तुमचे पोट साफ (stomach problem) होत नाही. बद्धकोष्ठतेची कारणे वेगवेगळी असू शकतात आणि हे सामान्यतः एखाद्या स्थितीऐवजी अंतर्निहित समस्येचे लक्षण मानले जाते. बद्धकोष्ठतेच्या काही संभाव्य कारणांमध्ये डिहायड्रेशन (dehydration) किंवा खूप कमी फायबर असलेले पदार्थ खाणे यांचा समावेश असू शकतो.
इतर, अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, बद्धकोष्ठता हे ताण, हार्मोनल बदल, पाठीच्या कण्याला दुखापत, स्नायूंच्या समस्या, कॅन्सर आणि पचनसंस्थेवर परिणाम करणाऱ्या संरचनात्मक समस्यांमुळे झालेला परिणाम असू शकतो.
पण बद्धकोष्ठतेबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. आयुर्वेदात प्रत्येक समस्येवर उपाय आहे, अशाच काही आयुर्वेदिक उपायांच्या मदतीने तुम्हाला आराम मिळू शकतो.
वात दोष संतुलित आहार
आयुर्वेदानुसार ‘वात’ हा मन आणि शरीराच्या सर्व क्रिया नियंत्रित करतो. त्यात हवा आणि जागा यांसारख्या घटकांचा समावेश होतो आणि वात हा सहसा कोरडा, हलका, थंड, उग्र, गतिमान आणि सतत बदलणारा असतो. वात दोष म्हणजे शरीरातील हवा आणि अंतराळ घटकांचे झालेले असंतुलन होय. या दरम्यान, आपल्या शरीरातील क्रिया, मज्जासंस्थेची क्रिया आणि आपल्या शरीरातून काढून टाकण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतो.
वात-संतुलित आहारामध्ये ताजे शिजवलेले, संपूर्ण पदार्थ जे मऊ किंवा रसाळ असतात. हे पदार्थ प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांनी समृद्ध असतात आणि ते गरमागरम सर्व्ह केले जातात. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थंड पदार्थ आणि शीतपेयांपासून दूर रहा आणि कोमट अन्न, कोमट पाणी आणि चांगल्या पद्धतीने शिजवलेल्या भाज्यांचे सेवन करा.
त्रिफळा
त्रिफळा हा बद्धकोष्ठतेसाठी सर्वात प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहे. त्रिफळामध्ये ग्लायकोसाइड असतात ज्यात रेचक गुणधर्म असतात. तुम्ही गरम पाण्यात त्रिफळा मिसळून चहा बनवू शकता. तसेच अर्धा चमचा धणे आणि एक चतुर्थांश चमचा वेलचीचे दाणे, एक चतुर्थांश टीस्पून त्रिफळा हे सर्व एकत्र बारीक करा आणि एका ग्लास पाण्यात मिसळा. व त्याचे सेवन करा. मलत्याग प्रेरित करण्यासाठी हे पेय खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते.
भाजलेली बडीशेप
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा भाजलेली बडीशेप मिसळा. भाजलेल्या बडीशेपेचे सेवन केल्याने काही गॅस्ट्रिक एन्झाईम तयार होण्यास मदत होते जे पचन प्रक्रियेस चालना देऊ शकतात आणि निरोगी आतड्यांसंबंधी हालचालींना चालना देऊ शकतात.
ज्येष्ठमधाचे मूळ
मुलेठी म्हणजे ज्येष्ठमधामध्ये दाहक-विरोधी प्रभाव असतो आणि ते पचनास मदत करू शकते. एक कप कोमट पाण्यात एक चमचा ज्येष्ठमधाची पावडर आणि एक चमचा गूळ मिसळा व प्या. मात्र याचे नियमितपणे सेवन करण्यापूर्वी, तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)