तोंडाचे आरोग्य सांभाळा नाही तर हृदय येईल धोक्यात ? असा करा बचाव

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हिरड्यांच्या संसर्गाशी संबंधित बॅक्टेरिआ हे तोंडाच्या माध्यमाद्वारे रक्तात प्रवेश करून रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचू शकतात. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

तोंडाचे आरोग्य सांभाळा नाही तर हृदय येईल धोक्यात ? असा करा बचाव
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 3:15 PM

नवी दिल्ली – आपल्यापैकी बहुतांश लोक हे तोंडाच्या आरोग्याकडे (oral health) विशेष लक्ष देत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO)नुसार, जगातील जवळजवळ अर्धी लोकसंख्या ही तोंडाच्या (खराब दात, हिरड्या आणि तोंडाचा कॅन्सर) (mouth cancer)आजाराने ग्रस्त आहे. आणि दरवर्षी ही प्रकरणे वाढतच चालली आहेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, मौखिक आरोग्य खराब असेल तर अनेक आजारांचा धोका वाढतो. तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर त्यासाठी दातांचे आरोग्यही (tooth care) निरोगी ठेवणे गरजेचे आहे. दात निरोगी असतील तर अन्न चावून खाण्याची क्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते. तसेच दात हे आपला चेहरा आणि आसपासच्या टिश्यूजचा आकार देखील योग्य राखतात.

तज्ज्ञ असे सांगतात की, तोंडाचे आरोग्य खराब असेल तर आरोग्यावर अनेक प्रकारचे हानिकारक परिणाम होऊ शकतात. ज्या लोकांच्या हिरड्यांमध्ये वेदना अथवा दाह होतो, तसेच ज्यांना पेरिओडॉन्टल रोग आहे त्यांनाही हृदयरोगाचा धोका असतो. हिरड्यांच्या संसर्गाशी संबंधित बॅक्टेरिआ हे तोंडाच्या माध्यमाद्वारे रक्तात प्रवेश करून रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचू शकतात. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

नॉलेज हेड, इल्यूजन अलायनर्स आणि डेंटल एक्सपर्ट डॉ. अनिल अरोरा सांगतात की, तोंडाच्या अथवा मौखिक आरोग्याचा केवळ आपल्या तोंडावरच परिणाम होत नाही तर आजूबाजूच्या अवयवांवर आणि टिश्यूजवरही होतो. उदाहरणार्थ, ज्या रुग्णांच्या दातांमध्ये पोकळी असते त्यांना हिरड्या आणि घशाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

हे सुद्धा वाचा

असे राखा तोंडाचे आरोग्य

तोंडाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही सोप्या गोष्टी करण्याची गरज असते, असे डॉ. अरोरा यांनी सांगितले. बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती असते, पण त्याचे योग्य प्रकारे पालन केले जात नाही. दररोज ब्रश करणे, फ्लॉस करणे आणि खळखळून चूळ भरणे या क्रिया सर्वांनी दररोज केल्या पाहिजेत. सकाळ व संध्याकाळी, असे दिवसातून दोनदा ब्रश करणे हे चांगल्या मौखिक आरोग्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. तसेच ब्रशचे ब्रिसल्स खराब होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दर सहा महिन्यांनी ब्रश बदलून दुसरा ब्रश वापरला पाहिजे.

रोज फ्लॉसिंगही केले पाहिजे

तोंडाच्या चांगल्या आरोग्यासाठी फ्लॉसिंग म्हणजे फ्लॉस करणे हे अत्यंत आवश्यक आहे. हे केल्याने आपल्या दातांच्या फटीमध्ये अडकलेली घाण दूर होते. त्यामुळे दाताला कीड लागत नाही. रात्री झोपणयापूर्वी एकदा फ्लॉसिंग जरू करावे. तसेच काहीही खाल्यानतर खळखळून चूळ भरली पाहिजे. त्यामुळे तोंडाचा पीएच स्तर कायम राहतो. तंबाखू खाणे, धूम्रपान करणे इत्यादी वाईट सवयींमुळे तुमच्या तोंडाचे नुकसान होऊ शकते. दातासंदर्भात कोणतीही समस्या आल्यावर मगच डॉक्टरांकडे जायचे असे करू नये. तर नियमितपणे दातांची तपासणी केली पाहिजे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.