हार्टअटॅक येऊ नये, असं वाटत असेल, तर मग ही माहिती जाणून घेणं फार फार महत्त्वाचंय!
चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला हृदयाशी संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात. वेळीच अशी काही लक्षणे आपल्याला जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.तुमच्यापैकी कोणालाही हृदयाशी संबंधित समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता आपण तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
भारताचा विचार करता देशाची लोकसंख्या आहे आणि त्याप्रमाणामध्ये हृदयाचा त्रास होणाऱ्या लोकांची संख्या देखील अधिक आहे, यामागील काही कारणं फार मूलभूत आहेत. सर्वप्रथम आपण हृदय रोग ( heart disease) म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. हृदय रोग म्हणजे फक्त हार्ट अटॅक नसून यामध्ये हाय ब्लडप्रेशर आणि त्याच्यामुळे होणारी कारणं किंवा त्यामुळे होणारे रोग म्हणजे पॅरालिसिस, हार्ट अटॅक या सगळ्यांचा समावेश असतो. आपण या गोष्टीचा विचार केला की भारतामध्ये या गोष्टीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे म्हणजे लेटेस्ट सर्वेक्षणानुसार (survey) जानेवारी च्या सर्वेक्षणानुसार 25 टक्के भारतीय लोक हे हार्ट अटॅक (heart attack) किंवा हायपरटेन्शन किंवा त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडत आहेत आणि हे प्रमाणही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालले आहे.आजच्या या लेखात डॉ अजित मेहता यांनी मोलाची माहिती सांगितली आहे . डॉ अजित मेहता हे जहांगीर हॉस्पिटलचे ज्येष्ठ आणि अनुभवी कार्डिओलॉजिस्ट विभागाचे प्रमुख आहेत. डॉक्टर गेल्या 15 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत.यांचे राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय जर्नल्स मध्ये अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. डॉ.अजित मेहता यांनी टिव्ही 9 शी बातचीत करताना हृदय विकार अनाई त्याची कारणे तसेच लक्षणे बद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.
1) हृदय विकार म्हणजे काय?
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या वयोमानानुसार त्यामध्ये कोलेस्ट्रॉल मुळे काही रक्ताच्या गाठी जमा होतात यामुळे हृदयाच्या त्या भागाला रक्तपुरवठा योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे हृदयाचा तो भाग कमकुवत होत जातो याचकारणाने हार्ट अटॅक येतो. वाढत्या वयानुसार हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॉलेस्ट्रॉल डिपोझिशन होवून त्यांचा भाग नॅरो होत जातो त्यामुळे त्यातून योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही. आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्या या पाईप प्रमाणे असतात वाढत्या वयानुसार त्यात कॉलेस्ट्रॉल डिपोझिशन झाल्यामुळे 70 ते 75 टक्के रक्तपुरवठा खंडित होतो आणि हृदयासंबंधी समस्या उद्भवतात
2) हार्ट अटॅक होण्यामागची नेमकी कारणे कोणती?
अनेकदा चुकीच्या लाईफस्टाईलमुळे सुद्धा आपल्याला आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये स्मोकिंग, स्ट्रेस, अल्कोहोल, ब्लड कॉलेस्ट्रॉल, स्थूलपणा यांसारख्या गोष्टींमुळे या समस्येत आपल्याला अधिक भर पडताना दिसते. तर दुसरीकडे वाढते वय यामध्ये सुद्धा साधारणपणे आपल्याला हाय ब्लडप्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक यांसारख्या समस्या साहजिकच वाढताना दिसतात. आनुवंशिक कारणामुळे सुद्धा यांसारखे आजार संभवतात.
3 ) हार्ट अटॅक ची नेमकी लक्षणं कोणती आहेत
सर्वात आधी आपण हार्ट अटॅकची लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे. अनेकदा आपल्याला याची वेगवेगळी लक्षणे पाहायला मिळतात. यामध्ये छातीत डाव्या बाजूला दुखणे, मळमळणे, हायपर ॲसिडीटी, अधिक प्रमाणात घाम येणे, दम लागणे ही अशी हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात.
4) कोणत्या गोष्टींमुळे आपण हार्ट अटॅक पासून स्वतः चा बचाव करू शकतो?
आपल्याला भविष्यात हृदयाच्या संबंधित कोणत्याही समस्या उद्भवू नये म्हणून अशावेळी आपल्याला आहाराबाबत काही पथ्य पाळणे सुद्धा गरजेचे आहे. बहुतेक वेळा पण बाहेरचे अनेकदा पदार्थ खात असतो. तेलकट-तुपकट,मसालेदार, मैद्याचे पदार्थ यामुळे अनेकदा शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. शरीरामध्ये बँड कोलेस्ट्रॉल वाढले तर त्याचे परिणाम रक्तप्रवाह क्रियावर होत असतो आणि अशावेळी हृदयाला पंपिंग करण्यासाठी अधिक प्रेशर द्यावा लागतो यामुळे सुद्धा हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो म्हणून जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या पोषक तत्व व विटामिन्स युक्त असलेली फळे सेवन करायला पाहिजे.हृदयविकाराच्या समस्या टाळण्यासाठी दिवसभरातून जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने योग्य व्यायाम, योगा ,आसने करायला हवीत यामुळे सुद्धा तुमच्या शरीराला चालना मिळेल व हृदयाची गती पहिल्यापेक्षा जास्त वाढेल.
टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये तज्ज्ञांची मते सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.