Diet during the festive season: सणांच्या दिवसात कोलेस्ट्रॉलवर ठेवायचे असेल नियंत्रण तर करा ‘ हे ‘ 6 बदल

सणासुदीच्या दिवसात आपण फराळाचे अनेक पदार्थ बनवतो, मिठाईही खातो. मात्र त्यामुळे आपली कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढू शकण्याचा धोका अधिक असतो.

Diet during the festive season: सणांच्या दिवसात कोलेस्ट्रॉलवर ठेवायचे असेल नियंत्रण तर करा ' हे ' 6 बदल
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 5:11 PM

नवी दिल्ली –  सणासुदीच्या (festivals) काळात आपल्या घरी फराळाचे विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. आपण मिठाईही विकत आणतो. मात्र या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपले आरोग्यही (health) बिघडू शकते. ज्यामुळे आपल्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची (cholesterol) पातळी वाढू शकते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने हृदयरोग आणि हार्ट फेल होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत औषधे वापरल्याने आपले कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होऊ शकते. पण नेहमी औषधांचा वापर करण्याऐवजी कोलेस्ट्रॉल सुधारण्यासाठी दैनंदिन आयुष्यात काही बदल केले तरी कोलेस्ट्रलवर नियंत्रण मिळवता येते.

आहारात काही बदल करून तुम्ही कोलेस्ट्ऱॉलची पातळी नियंत्रित करू शकता व हृदयाचे आरोग्यही सुधारू शकता. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

फॅटयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे – जागरण डॉट कॉम नुसार, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी चरबी आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढविण्याचे कार्य करते. फॅट किंवा चरबीयुक्त अन्नाचे सेवन कमी केल्याने लिपोप्रोटी कोलेस्ट्रॉल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

सॉल्यूबल फायबरचा आहारात करा समावेश – जास्त प्रमाणात विरघळणाऱ्या फायबरचे सेवन केले पाहिजे. ते आपल्या रक्तप्रवाहात कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते.

प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत – प्रोटीन्स किंवा प्रथिने ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. एका संशोधनात असे दिसून आले आहे की प्रथिने एलडीएल कोलेस्ट्रॉल तसेच रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

रोज व्यायाम करावा – आपण दररोज थोडा तरी व्यायाम केला पाहिजे. व्यायामामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते.

धूम्रपान करू नये – धूम्रपान हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते, त्यामुळे सिगारेट पिऊ नये. धूम्रपान बंद केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात येण्यास मदत होते.

दारू पिणे बंद करावे –

अल्कोहोल कमी प्रमाणात प्यायले पाहिजे. जास्त मद्यपान केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.