वजन घटवण्यासाठी फॉलो करा जपानी महिलांची फूड हॅबिट्स, दिसेल परिणाम

जपानी महिलांच्या खाण्या-पिण्याच्या पद्धतीचे अनुसरण केल्यास वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे किंवा वजनवाढ रोखणे शक्य आहे.

वजन घटवण्यासाठी फॉलो करा जपानी महिलांची फूड हॅबिट्स, दिसेल परिणाम
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 9:56 AM

नवी दिल्ली – आजकाल अनेक लोकं वाढत्या वजनामुळे (weight gain) त्रस्त आहे. वाढलेले अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी ते जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करत घाम गाळतात. बऱ्याच महिला या वाढलेल्या वजनासाठी त्यांच्या हाडांच्या रचनेला (bone structure) कारणीभूत ठरवत दोष देतात. तर काही महिलांना आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढले असे वाटते. दरम्यान, यासंदर्भात करण्यात आलेल्या एका संशोधनात (research) असे नमूद करण्यात आले आहे की, जपानी महिलांच्या खाण्या-पिण्याच्या पद्धतीचे अनुसरण केल्यास वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे किंवा वजनवाढ रोखणे शक्य आहे. त्या पद्धती काय आहेत हे जाणून घेऊया.

शिळे अन्न खाणे टाळावे

हे सुद्धा वाचा

असे म्हटले जाते की जपानमधील स्त्रिया या पॅकबंद अन्नपदार्थ किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खात नाहीत. Japanese Women Don’t Get Old Or Fat च्या लेखिका निओमी मोरियामा यांनी त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. जपानी स्त्रिया या नेहमीच ताजे बनवलेले पदार्थ खाणं पसंत करतात. मात्र भारतासह अमेरिका तसेच अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये सध्या फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. अन्न शिळे झाल्यानंतर त्यामधील विषाचे प्रमाण वाढते. तसेच शिळे पदार्थ खाल्ल्यानंतर जडपणा जाणवतो. त्यामुळे शिळे अन्न खाणे टाळावे.

शिळे अन्न का खाऊ नये? एकदा एखादा पदार्थ शिजवला की थोड्या वेळानंतर त्यातील पोषणमूल्ये कमी होऊ लागतात. अन्नामध्ये असलेले अनेक एंजाइम्स आणि व्हिटॅमिन्स ही निकृष्ट होऊन विषारी बनतात. तसेच गोठवलेले मांस वगैरे पदार्थांमध्ये मिठाचा अतिवापर केल्याने आपल्याला रक्तदाबासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की, काही हानिकारक जीवाणूंची कमी तापमानात देखील वाढ होते व ते अन्न खराब करतात. म्हणून शिळे अन्न खाऊ नये. पदार्थ ताजा असतानाच तो संपवावा.

हेल्दी कुकिंग

2005 साली, न्यूट्रिशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, जपानमधील लोकाना शाकाहारी पदार्थ खूप आवडतात. जपानी स्त्रियांन हिरव्या बीन्स, गाजर, पालक, कांदे, टोमॅटो आणि इतर अनेक जपानी भाज्यांचे पदार्थ शिजवायला खूप आवडतात. भाज्या वाफवून खाण्यास ते अधिक प्राधान्य देतात. तसेच लाल मांस खाणे कटाक्षाने टाळतात. हेल्दी कुकिंगचा पर्याय जपानी महिला निवडतात.

तुम्हालाही तुमचे वाढते वजन रोखायचे असेल तर पोषक आहार घेऊन ताजे अन्नपदार्थ खाण्यास प्राधान्य द्यावे.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.