Bowel Cancer: पोटदुखीच्या अगदी छोटाशा त्रासाकडेही दुर्लक्ष नको! Bowel Cancerच्या दुर्मिळ लक्षणांबाबत जाणून घ्या
Bowel Cancer Symptoms : आतड्याच्या कॅन्सरच्या पहिल्या पातळीत योग्य उपचारांनी रुग्ण सुखरूप बरा होऊ शकतो. शरीरात कॅन्सर विषाणू पसरल्यानंतर कॅन्सरग्रस्त बरा होणे अवघड होते. जाणून घेऊया शरीरात दिसणारे आतड्याच्या कॅन्सरची लक्षणे
फुटपाथवर झोपणारा गरीब असो वा मोठा सेलेब्रिटी, नेता किंवा कोणी अबज्याधीश असो. जगात कोणीही कॅन्सर आजारापासून अपरिचित नाही आहे. कॅन्सरचे नाव ऐकताच अंगाला काटा येतो. त्यात कॅन्सरग्रस्त व्यक्ती तर शारीरिकपेक्षा मानासिकदृष्ट्या जास्त खचतो. परंतु, पहिल्या पातळीवर( first stage) कॅन्सर असल्याचे समजल्यास रुग्ण बरादेखील होतो. त्यात एक आतड्याचा कॅन्सरदेखील (bowel cancer) आहे. त्याला कोलोरेक्टल कॅन्सर (colorectal cancer) असेही म्हणतात. मागील काही वर्षांचा तुलनेत आतड्याच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले असल्याचे तज्ञ सांगतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे बदलेली जीवनशैली, खाणेपिण्याचा सवयी, व्यायामाचा अभाव. तर मुख्य कारण म्हणजे कॅन्सरबाबत माहिती नसणे. तज्ञ सांगतात, आतड्याच्या कॅन्सर होताच सूक्ष्म लक्षणं दिसून येतात. नंतर वाढत जाऊन शरीरात पसरतात. त्यावेळी रुग्णाला जास्त त्रास होतो. त्यात रुग्णाचा जीव जाऊ शकतो. कॅन्सरवर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आदींचा समावेश असतो. आतड्याच्या कॅन्सरची लक्षणे जाणून घेऊया…
शौचावाटे रक्त येणे
आतड्याचा कॅन्सरचे हे एक लक्षण आहे. कधी कधी लोक मूळव्याध (piles) झाल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. शौचावाटे रक्त येत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. शौचातुन येणारे रक्त आतड्याच्या कॅन्सर पण असू शकतो. तुमचे एक पाऊल तुमचा जीव वाचवू शकतो.
पोटात दुखणे
आहारात ताजी फळे, भाजी यांचा समावेश असावा. बदलेली जीवनशैली, चरबीयुक्त पदार्थाचे सेवन यामुळे पोटाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. पोटात दुखणे हे साहजिक असते पण, सारखं पोटात दुखणे चिंतेची बाब असू शकते. हेल्थ एक्सपर्ट सांगतात, वारंवार पोटात दुखणे हे आतड्याच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
पचनक्रियेत बिघाड
जर पोटात बद्धकोष्ठता या पचनक्रियेसंबंधी काही समस्या असल्यास त्याचा उपाय करणे आवश्यक आहे. पचनक्रियेत बिघाड, ऍसिडिटी, पोट जड होणे अशा पोटासंबंधी समस्या होत असतात. त्याचा उपचार करून देखील पचनक्रिया सुधारत नसेल तर आतड्याचा कॅन्सर असू शकतो. उत्तम पचनक्रियेसाठी आहारात फायबरयुक्त आहाराचा समावेश करू शकता. वरील लक्षणं दिसताच वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. नाहीतर रुग्णाला जीव गमवावा लागू शकतो.