IIT कानपूरचे केवळ एका थेंबातून रक्तचाचणी करणारे संशोधन, या गंभीर आजाराचे झटपट निदान होणार

आयआयटी कानपूरने वैद्यकीय संशोधनात क्रांतीकारक सुविधा निर्माण केली आहे. रक्ताच्या केवळ एका थेंबातून गंभीर आजाराचे निदान करणारी स्ट्रीप शोधून काढली आहे.

IIT कानपूरचे केवळ एका थेंबातून रक्तचाचणी करणारे संशोधन, या गंभीर आजाराचे झटपट निदान होणार
iit kanpurImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 12:47 PM

नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : आयआयटी कानपूर ( IIT KANPUR ) आपल्या संशोधनाबद्दल आपल्या देशातच नाही तर जगात नावाजले जाते. वैद्यकीय क्षेत्रात देखील आयआयटी कानपूरच्या संशोधकांचे संशोधन नावाजले गेले आहे. आयआयटी कानपूर वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन संशोधन करीतच आहे. आता आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी रक्ताच्या केवळ एका थेंबातच काविळीचे निदान करणारे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. एप्रिल 2024 पर्यंत हे नविन तंत्रज्ञान बाजारात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे. त्यांनी एक अशी स्ट्रीप विकसित केली आहे की ज्याच्यावर रक्ताचा एक थेंब जरी टाकला तर त्याचा अहवाल एकदम कमी वेळात येणार आहे. साधारण काविळीची तपासणी करण्यासाठी किमान तीन एमएल रक्ताची गरज असते. परंतू या नव्या स्ट्रीपमुळे रक्ताचा केवळ एक थेंबही काविळीच्या तपासणीसाठी पुरेसा आहे. त्यामुळे काविळीचे निदान झटपट होणे शक्य होणार आहे.

संशोधकांनी खास स्ट्रीप बनविली

आयआयटी कानपूरचे संचालक प्रो. अभय करंदीकर यांनी सांगितले की कानपूरच्या संशोधकांनी एक खास स्ट्रीप तयार केली आहे. जे आरोग्याच्या क्षेत्रात क्रांतिकारक ठरणार आहे. ही जगातील पहिली अशा प्रकारची स्ट्रीप आहे. ज्यात रक्ताच्या केवळ एका थेंबातच रक्त तपासणी करता येणार आहे. नॅशनल सेंटर फॉर फ्लॅक्सिबल इलेक्ट्रॉनिक्समधील केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक प्रोफेसर सिद्धार्थ पांडे आणि निशांत वर्मा या दोघा संशोधकांनी हे संशोधन केले आहे.

एप्रिल 2024 पर्यंत बाजारात येणार

संशोधकांनी एक नॉन एंजाईम इलेक्ट्रोकेमिकल सेंसिंग स्ट्रीप विकसित केली आहे. ही स्ट्रीप पाच इलेक्ट्रोड कंफीग्रेशनच्या समावेशाने एका स्ट्रीपवर प्रत्यक्ष आणि कावीळीला जबाबदार असलेल्या बिलीरुबिन द्रवाच्या वाढलेल्या प्रमाणाची चाचणी करु शकणार आहे. आयआयटी कानपूरने विकसित केलेली ही स्ट्रीप बाजाारात एप्रिल 2024 पर्यंत उपलब्ध होऊ शकणार आहे. यासाठी आयआयटी कानपूरने हैदराबाद येथील कंपनी सेसा कोर मेडीकल इंस्ट्रुमेंटेशन प्रायव्हेट लि. ला लायसन्स दिले आहे. ही कंपनी बाजारात हे तंत्रज्ञान उपलब्ध करणार आहे.

तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.