सावधान, तुमचीही मुलं घरात चुकीच्या पद्धतीने बसताय? मग ‘हे’ उपाय वाचाच, सर्वेक्षणात धक्कादायक खुलासे

घरात मुलांच्या बसण्याची योग्य व्यवस्था नसल्यानं अनेक मुलं गादीवर किंवा जमिनीवर चुकीच्या पद्धतीने बसत असल्याचं गोदरेज अँड बॉयसने केलेल्या सर्वेक्षणात समोर आलंय.

सावधान, तुमचीही मुलं घरात चुकीच्या पद्धतीने बसताय? मग 'हे' उपाय वाचाच, सर्वेक्षणात धक्कादायक खुलासे
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 7:13 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू निर्बंधांमुळे मुलं अधिक वेळ घरातच असतात. त्यात ऑनलाईन क्लासमुळेही मुलं तासंतास एका जागेवर बसून असतात. विशेष म्हणजे घरात मुलांच्या बसण्याची योग्य व्यवस्था नसल्यानं अनेक मुलं गादीवर किंवा जमिनीवर चुकीच्या पद्धतीने बसत असल्याचं गोदरेज अँड बॉयसने केलेल्या सर्वेक्षणात समोर आलंय. चुकीच्या बसायच्या पद्धतीमुळे घरून अभ्यास करणाऱ्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहे. भारतातील आघाडीचा फर्निचर ब्रँड असणाऱ्या गोदरेज इंटेरिओने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात मुलांच्या आरोग्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेत. तसेच तज्ज्ञांकडून उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत. याचाच हा खास आढावा (Important tips for health of children due to wrong sitting way in home amid corona lockdown).

41 टक्के मुलांना डोळ्याच्या तक्रारी

‘घरून शिक्षण घेत असताना मुलांची घ्यायची काळजी’या विषयावर गोदरेज इंटेरिओ आणि एरगॉनॉमिक्स रिसर्च सेल यांनी अभ्यास केला. त्यासाठी भारतभरातील 3-15 या वयोगटातील 350 शालेय विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यात आला. लॉकडाऊन मुळे शाळा बंद व्हायच्या आधीच्या काळापेक्षा 2-3 तास जास्त म्हणजेच दिवसाला साधारण कमीत कमी 4-6 तास मुलं गॅजेट वर असतात असं या संशोधनात सहभागी झालेल्या पालकांनी सांगितलं. या वाढलेल्या स्क्रीन टाईम मुळे मुलांच्या शारीरिक आरोग्याचा धोका वाढला आहे. या अभ्यासातून हेही उघड झाले आहे की 52 टक्के विद्यार्थ्यांचे दररोज ऑनलाईन वर्ग असतात तर 36 टक्के मुलांचे ऑनलाईन वर्ग आठवड्यात चार वेळा असतात आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की 41 टक्के मुलांनी डोळ्यावर ताण येत असल्याच्या तक्रारी केल्या.

मुलांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

याला प्रतिसाद म्हणून गोदरेज इंटेरिओने ‘घरून शिक्षण घेण्यासाठी मुलांना मदत’ या विषयावर एका वेबिनारचे आयोजन केले होते. यामध्ये मुलांचे पालक आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. राज्य सरकारने या महामारीला आटोक्यात ठेवण्यासाठी मायक्रो लॉकडाऊन ठिकठिकाणी सुरूच ठेवल्यामुळे मुलांना घरूनच शिक्षण घेणे भाग पडत आहे. अशा वेळी त्यांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी घरात योग्य वातावरण निर्माण करण्याचे सर्वोत्तम मार्ग याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. या वेबिनार मध्ये शिकण्यासाठीची योग्य जागा, चांगल्या आहाराची गरज आणि मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी योग्य वातावरण तयार व्हावे म्हणून करायचे शारीरिक व्यायाम या सर्वांवर प्रकाश टाकण्यात आला.

आज झालेल्या सत्रात 1700+ हून अधिक जण सहभागी झाले होते. यामध्ये आघाडीच्या शिक्षणतज्ञ आणि आरोग्यसेवा तज्ञांकडून या काळातील आव्हाने आणि त्यावरील उपाय याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या वेबिनारचे संयोजन जागरण एज्युकेशन फाऊंडेशनचे सीडीओ लेफ्टनंट कर्नल ए शेखर यांनी केले. पॅनेलमध्ये डीपीएस नाशिक, वाराणसी आणि लावा नागपूरचे संचालक सिद्धार्थ राजगर्हिया, कोर्रोबोरीच्या सहसंस्थापक लीना अक्षर, बाल मानसतज्ञ चांदनी भगत, आगरकर सेंटर ऑफ एक्सलन्सच्या संस्थापक फातिमा आगरकर आणि गोदरेज इंटेरिओच्या वर्कप्लेस आणि कार्याभ्यास संशोधन विभागाच्या मुख्य अभ्यासक डॉ. रीना वालेचा यांचा समावेश होता.

प्रत्यक्ष आणि ऑनलाईन यांचे मिश्रण करून अध्ययन

एक तासाच्या या अभ्यासपूर्ण वेबिनार मध्ये तज्ञांनी या विषयाबाबतच्या विविध मुद्द्यांचा उहापोह केला. त्यामध्ये घरातून शाळा शिकतानाची मुलांची वर्तणूक, बसण्याची योग्य पद्धत, मुक्त वातावरणात शिक्षण घेत असताना घ्यायची काळजी असे विविध मुद्दे होते. आपण अंदाज केला होता त्यापेक्षा ऑनलाईन शिक्षण जास्त काळ सुरु आहे. अशा वेळी मधल्या सुट्टीचे महत्व आणि जुनी चांगली पेपर-पेन्सिल पद्धत यांच्याविषयी भाष्य केले. जोडीला प्रत्यक्ष आणि ऑनलाईन यांचे मिश्रण करून अध्ययन करता येईल का यावर विचार झाला. दीर्घकाळ चुकीच्या पद्धतीने अभ्यासाला बसल्यामुळे पाठीच्या मणक्यांचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे मुलांना कशा प्रकारे योग्य वातावरण तयार करून देता येईल यासाठीचे साधे सोपे मार्ग डॉ.रीना वालेचा यांनी सांगितले.

आपल्या मुलांसाठी अभ्यासासाठी बसायची योग्य जागा गरजेची

गोदरेज इंटेरिओचा मुख्य भर नेहमीच आपल्या जीवनासाठी, शिक्षणासाठी आणि स्वतःच्या इच्छा-आकांक्षा जोपासण्यासाठी चांगली जागा निर्माण करण्याकडे आहे. त्यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने रचना केलेल्या उत्पादन आणि सुविधांमधून आपल्या ग्राहकांच्या जीवनाची गुणवत्ता रोजच्या दिवसाला आणि सगळीकडे सुधरविणे यावर राहिला आहे. त्यांची वर्क प्लेस आणि एरगॉनॉमिक्स रिसर्च सेल नियमीतपणे ग्राहकांच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवर अभ्यास, सर्वेक्षण करत असते. त्यामुळे गोदरेज इंटेरिओ त्यांना मिळालेले ज्ञान वाटून आरोग्यपूर्ण वर्तणूक पद्धतींचा प्रचार करते. हा वेबिनार म्हणजे आघाडीच्या तज्ञांनी सुचविलेल्या उपायांच्या दिशेने पुढे टाकलेले पाऊल आहे. पालक आणि मुलांची काळजी घेणारे जेव्हा आपल्या मुलांसाठी अभ्यासासाठी बसायची योग्य जागा तयार करण्याचा विचार करतात तेव्हा त्यासाठी त्यांना हे अत्यंत योग्य मार्गदर्शन ठरणार यात शंका नाही.

गोदरेज इंटेरिओने आपल्या असंख्य उत्पादन आणि सुविधांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राला ३० वर्षांहून अधिक काळ मोलाचे पाठबळ पुरविले आहे आणि 15,000 हून अधिक शैक्षणिक संस्थांना सेवा पुरवली आहे.

तज्ज्ञांनी मांडलेले मुद्दे

आगरकर सेंटर ऑफ एक्सलन्स (एसीइ) च्या संस्थापक फातेमा आगरकर म्हणाल्या, “व्हर्च्युअल शाळेमुळे इतक्या कठीण परिस्थितीतही ‘शिक्षण’ सुरु राहिले आहे. शैक्षणिक मार्कांची उद्दिष्टे गाठण्यापेक्षाही महत्वाच्या कौशल्यांचा विकास यावर हे आधारित आहे. बहुतांश प्रगतीशील कुटुंबात आणि शाळांमध्ये हे वर्ष प्रयोगातच गेले. कारण घरांचे रुपांतर शाळांमध्ये झाले आणि विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी शाळा तंत्रज्ञानाचे व्यासपीठ बनल्या. जुळवून घेणे, क्षमता बांधणी आणि क्षमता विकास हा जीवनाचा भाग बनला आणि या नव्या न्यू नॉर्मल जीवनशैलीमुळे अनेकांना पुनर्विचार, पुनर्रचना करायला भाग पडले. आव्हानांमुळे मोडून पडण्यापेक्षा विकासासाठी याकडे संधी म्हणून बघताना काही ‘पारंपरिक’ विश्वासांना सोडून द्यावं लागलं. माझ्या दृष्टीने योग्य गोष्ट म्हणजे लवचिक धोरण आणि खुल्या मानाने या नवीन पद्धतीचा अंगीकार करणारी कुटुंबे आणि पालकांच्या पाठबळाचा आदर करणाऱ्या शाळा यांनी हा प्रवास रेखाटला आहे. जोडीला, गोदरेज इंटेरिओच्या ‘टेकिंग केअर ऑफ चिल्ड्रन अॅज दे लर्न फ्रॉम होम’ यासारख्या वेबिनारमधून पालकांना व्हर्च्युअल लर्निंगने आपल्यापुढे निर्माण केलेल्या संधी आणि त्यासाठीचे अनेक नाविन्यपूर्ण मार्ग यांची माहिती मिळते.”

कोर्रोबोर्रेच्या सहसंस्थापक लीना अक्षर म्हणाल्या, “या काळाने जर आपल्याला काही शिकवले असेल तर ही गोष्ट आहे की गणित, इंग्रजी, इतिहास, भूगोल यांच्यापेक्षाही कणखर मानसिकता, चपळाई, अनुकूलक्षमता, सहानुभूती, स्वतःबद्दलची जाणीव, स्व-नियमन, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि सर्जनशीलता या जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत. परिस्थिती आणि घटनांकडे आपण कशा प्रकारे बघावं यासाठी आपल्याकडे नेहमी पर्याय असतात. मुलांचे दृष्टीकोन हेही बहुतेकवेळेला पालकांकडे बघूनच ठरत असतात. तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या भावनिक आरोग्याची गुणवत्ता सुधारणे वा कमी करणे; शिक्षण, प्रेरणा मिळावी अशा कशासाठी करायचा याचा पर्याय आपल्याकडे असतो. आपण या गोष्टीकडे ज्या पद्धतीने बघू त्यावरून आपण त्याचा वापर कसा करणार आणि त्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होणार हे ठरत असते. आपल्या मुलांसाठी योग्य पर्यायांची निवड करण्यासाठी प्रबोधन करणारे गोदरेज इंटेरिओच्या ‘टेकिंग केअर ऑफ चिल्ड्रन अॅज दे लर्न फ्रॉम होम’ यासारखे वेबिनार ही खूप महत्वाची साधने आहेत.”

प्रथितयश बाल मानसतज्ञ चांदनी भगत म्हणाल्या, “सध्याच्या महामारीचे संकट मुलांसाठी खरोखरच खूप आव्हानात्मक आहे. सलग दुसऱ्या वर्षी ते घरातून शालेय शिक्षण घेत आहेत. अनेक प्रश्न त्यांना भेडसावतात. त्यापैकी काही तर ते मोकळेपणाने व्यक्तही करू शकत नाहीत. मुलांना घरून शिक्षणाचा एक चांगला आरोग्यपूर्ण अनुभव देण्याची गरज आहे यावर गोदरेज इंटेरिओच्या ‘टेकिंग केअर ऑफ चिल्ड्रन अॅज दे लर्न फ्रॉम होम’ या वेबिनारमध्ये भर देण्यात आला.”

गोदरेज इंटेरिओच्या विपणन (बीटूबी) विभागाचे सहयोगी उपाध्यक्ष आणि प्रमुख समीर जोशी या वेबिनार बद्दल बोलताना म्हणाले, “आज आपण महामारीच्या अनिश्चित, डळमळीत परिस्थितीत सापडलो आहोत. पालक आणि मुलं यांच्यावर घरून शिक्षण लादलं गेलं आहे आणि आणखी काही काळ ते तसेच सुरु राहणार आहे. शिक्षणाची ही नवी पद्धत सुरक्षित असली तरी काही प्रमाणात या पद्धतीने काही आव्हानेही निर्माण केली आहेत. मुले सतत लेक्चर साठी किंवा असाईनमेंट पूर्ण करण्यासाठी लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर बसलेली असतात. अनेकदा अभ्यास करताना चुकीच्या पद्धतीने बसले जाते. शारीरिक हालचाली कमी झाल्याचा परिणामही मुलांच्या आरोग्यावर होतो.

आमच्या ‘टेकिंग केअर ऑफ चिल्ड्रन अॅज दे लर्न फ्रॉम होम’ सर्वेक्षणात 53 टक्के मुलांनी ऑनलाईन वर्गांमुळे दिवस अखेरीला आपण थकून जात असल्याचे सांगितले. चांगल्या प्रकारे संशोधन केलेल्या या अभ्यासाचा उपयोग पालक आणि शिक्षक करून घेतील आणि मुलांसाठी चांगले अध्ययन वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना या अभ्यासातून मार्गदर्शन होईल अशी आम्हांला आशा आहे. यामध्ये तपशीलवार दिलेले छोटे छोटे आणि सहज करता येण्याजोगे बदल अभ्यासासाठीच्या वातावरणात केले तर मुले दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहतील.”

हेही वाचा :

म्युकरमायकोसिसचा कहर, मुंबईत तीन मुलांनी गमावले डोळे, तर मुलीला डायबेटिसची लागण

पुण्यातही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, ‘नोव्हाव्हॅक्स’च्या लसीची ‘सीरम’कडून ट्रायल

कोरोना कधी होऊन गेला कळलंही नाही; नागपुरात लहान मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडिज

व्हिडीओ पाहा :

Important tips for health of children due to wrong sitting way in home amid corona lockdown

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.