Diabetes मध्ये 4 भाज्यांना अजिबात खाऊ नका, Blood sugar वाढण्यास लावतात हातभार

डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी डाएटची खास काळजी घ्यायलाच हवी. डाएटमध्ये अशा गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते ज्याच्या आहारातील समावेशाने ब्लड शुगरवर परिणाम होतो.

Diabetes मध्ये 4 भाज्यांना अजिबात खाऊ नका, Blood sugar वाढण्यास लावतात हातभार
diabetesImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 9:12 PM

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : डायबिटीज हा आजार हल्ली सर्वत्र पाहायला मिळत आहे. व्यायामाचा अभाव आणि आरामदायी जीवनशैलीमुळे या आजाराची लक्षणे वाढू लागली आहेत. हा आजार पचनक्रियेशी संबंधित असल्याने डायबिटीजमध्ये आहारावर निर्बंध येतात. त्यामुळे कोणते पदार्थ टाळावेत याचे भान असणे गरजेचे असते. शरीरात इन्सुलिनची निर्मिती कमी झाल्याने हा आजार होतो असे ढोबळमानाने मानले जाते. स्वादुपिंडात इन्सुलिनची निर्मिती केली जाते. हे एक संप्रेरक आहे जे रक्तातील साखरेचे नियंत्रण करते. जेव्हा शरीर इन्सुलिन तयार करीत नाही तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायकरित्या वाढते. तेव्हा आहारात काही पदार्थ टाळायलाच हवेत.

डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी डाएटची खास काळजी घ्यायलाच हवी. डाएटमध्ये अशा गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते ज्याच्या आहारातील समावेशाने ब्लड शुगरवर परिणाम होतो. त्यामुळे आपण आहारात जास्त शर्करा असलेले पदार्थ कटाक्षाने टाळत असतो. डायबिटीज तज्ज्ञांच्या मते भाज्या खाणे हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. परंतू सर्वच भाज्याकाही डायबिटीजवाल्यांना उपयोगी नाहीत. काही भाज्या खाल्ल्याने आपली शुगर लेव्हल चांगलीच वाढू शकते. त्यामुळे त्यांना आहारातून बाद करणेच उत्तम आहे. चला तर पाहू यात तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे.

रताळे धोकादायक

रताळे आपण उपवासाला उकडून खात असतो. हे कंदमुळ  म्हणजे बटाट्याचे दुसरे रुप आहे. त्याने साखरेचे प्रमाण वेगाने वाढते. रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 65 च्या बरोबरीने आहे. यातही कार्बोहायड्रेट असते ज्याने साखरेचे प्रमाण प्रचंड वाढते.

मक्यापासून दूर राहा

मक्याला तर इंग्रजीत स्वीट कॉर्न म्हणतात. त्यामुळे त्याने साखरचे प्रमाण जास्त होते. मक्क्यांचे कणिस आपण आवडीने खातो, परंतू डायबिटीस असलेल्या लोकांसाठी तो धोकादायक आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 55 आहे. जो मध्यम वर्गवारीचा आहे. परंतू यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जादा असते. ज्यांना ब्लड शुगर जास्त आहे. त्यांनी मक्का टाळावाच. त्याने शुगरचे प्रमाण वाढते.

भाज्यांचा रसापासून दूर राहा

काही जण भाज्यांचे सूप करून पितात. परंतू तुम्ही गाजराचा ज्युस पित असाल तर तातडीने बंद करा. गाजर गोड असल्याने त्याने साखर वाढते. तसेच ज्युसमध्ये फायबर नसते. त्यामुळे त्याचे सेवन केल्यास तुमचे ब्लड शुगर वाढते.

बटाट्यापासून चारहात दूर राहा

जर तुम्हाला ब्लड शुगर जास्त आहे तर बटाटा सारख्या पिष्ठमय पदार्थ कटाक्षाने टाळायला हवा. बटाटाच्या ग्लायसेमिक इंडेक्स 70 ते 90 दरम्यान आहे, जो खूपच जास्त आहे. यात कार्बोहायड्रेड जास्त असते. ज्यामुळे ब्लड शुगर वाढते. 100 ग्रॅम बटाट्यात 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 2 ग्रॅम फायबर असते. त्यामुळे बटाटा खावू नयेच हेच उत्तम.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.