बाळंतपणावेळी आई दगावण्याची भीती! चिंताजनक आकडेवारीची धास्ती, गेल्या वर्षीच्या तुलनेत माता मृत्यू वाढले!
धक्कादायक बाब म्हणजे मातांचा सर्वाधिक मृत्यू हा महापालिकेच्या रूग्णांलयामध्ये झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे जिल्हास्तरावर मृत्यूचा आकडा हा घटला आहे. 2020 च्या आकडेवारीनुसार 1 हजार 275 राज्यामध्ये मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आरोग्य विभाग मृत्यू रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. मात्र, 2021-2022 मध्ये संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट होते. यादरम्यान लोकांना घराच्या बाहेर निघणे देखील शक्य नव्हते.
मुंबई : राज्यामध्ये माता मृत्यू दर रोखण्यासाठी प्रशासनाकडून (Administration) वेगवेगळ्या उपायोजना केल्या जातात. यामध्ये जनजागृती, सोयी, सुविधांची माहिती आणि पोस्टर लावले जातात. मात्र, हे सर्व करूनही राज्यामध्ये माता मृत्यू दर वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 160 मृत्यू वाढल्याचे समोर आले आहे. माता मृत्यू दर वाढण्याची कारणेही अनेक आहेत. सध्याच्या खराब जीवनशैलीमध्ये उच्च रक्तदाबाची (Blood pressure) प्रमुख समस्या अनेक महिलांमध्ये दिसून आलीये. त्यामध्येही अनेक मातांना कोरोनाची (Corona) लागण देखील झाली होती. संपूर्ण राज्यामध्ये 2021-2022 मध्ये तब्बल 1435 मातांचा जीव गेला आहे. त्यामुळे होणारी गुंतागुंत यामुळेच सर्वात जास्त मृत्यू झाल्याचे देखील पुढे आले आहे.
2021-2022 मध्ये तब्बल 1435 मातांचा मृत्यू
धक्कादायक बाब म्हणजे मातांचा सर्वाधिक मृत्यू हा महापालिकेच्या रूग्णांलयामध्ये झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे जिल्हास्तरावर मृत्यूचा आकडा हा घटला आहे. 2020 च्या आकडेवारीनुसार 1 हजार 275 राज्यामध्ये मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आरोग्य विभाग मृत्यू रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. मात्र, 2021-2022 मध्ये संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट होते. यादरम्यान लोकांना घराच्या बाहेर निघणे देखील शक्य नव्हते. तसेच ग्रामीण भागामध्ये दळण-वळणाची साधणे देखील नव्हती. त्यामध्ये गर्भवती महिलांना उपचार घेण्यासाठी रूग्णालयामध्ये पोहचता येत नव्हते, यामुळेच माता मृत्यू दर वाढल्याचे बोलले जात आहे.
कोणत्या जिल्हात किती मातांचा मृत्यू
माता मृत्यू दर सर्वाधिक पुण्यामध्ये झाल्याचे आकडेवारीवरून पुढे येत आहे. पुण्यामध्ये तब्बल 46 मातांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर नागपूरमध्ये 40 मातांचा मृत्यू झालाये. सांगली 33, औरंगाबाद 25, कोल्हापूर 17, जळगाव 17, धुळे 13, गडचिरोली 7, पालघर 7, सोलापूर 7, यवतमाळ 5, अहमदनगर 4, बुलडाणा 3, वर्धा 3, लातूर 3, ठाणे 3, वर्धा 3, पिंपरी चिंचवड 2, नंदुरबार 2, नांदेड 2, अकोला 1, मालेगाव 1 याप्रमाणे आकडेवारी आहे.
स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. शमा भुक्तरे यासंदर्भात काय म्हणतात जाणून घ्या…
डिलेवरी दरम्यान व नंतर होणाऱ्या अतिरक्तस्त्रावात्मा पार्टम रक्तस्त्राव असे म्हणतात. दरम्यान हे डिलेवरी झाल्याच्या 12 आठवड्यापर्यंत होऊ शकतो. माता मृत्यू हे सर्वाधिक डिलेवरी दरम्यान रक्तस्त्रावामुळे होतात. मात्र, हे टाळण्यासाठी महिलांनी गर्भवती राहिल्यानंतर डाॅक्टरांच्या सतत संपर्कात राहणे आवश्यक आहे. तसेच गर्भवती महिलेचे खानपान देखील व्यवस्थित असावे. कोरोनाच्या काळामध्ये माता मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले, कारण यादरम्यान महिला उपचार घेण्यासाठी रूग्णालयांपर्यंत आल्या नाहीत. गर्भवती महिलांनी रक्तस्त्राव टाळण्यासाठी मधुमेह आणि बिपी नियंत्रणात ठेवणे देखील महत्वाचे आहे.