Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुष, सारा आणि अक्षय स्टारर ‘अतरंगी रे’मध्ये दाखवलेला PTSD आजार म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊ

करोना आणि लॉकडाउननंतर संपूर्ण जगातच मानसिक आजारांची सर्वाधिक चर्चा होते. कधी हे आजारांवर बोलणे टाळली जायचे. आजमात्र मोकळेपणाने या मानसिक आजारांवर चर्चा होते. हेच कारण आहे की लोकांचा मानसिक स्वास्थाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मानसिक स्वास्थावर जागृती करण्याच्या साधनांवरही मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अशातच बहुतांश सिनेमांमध्येही मानसिक आजारांशी संबंधित विषय प्रामुख्याने सादर केले जात आहेत.

धनुष, सारा आणि अक्षय स्टारर 'अतरंगी रे'मध्ये दाखवलेला PTSD आजार म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊ
प्रातिनिधिक चित्र
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 7:40 PM

धनुष (Dhanush), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अक्षयकुमार (Akshay Kumar) यांची प्रमुख भूमिका असलेल्या आणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) सिनेमामध्ये मानसिक आजार आणि ट्रॉमा या विषयांना सादर केले आहे. या सिनेमात सारा अली खान Post Traumatic Stress Disorder (PTSD) या आजाराने पीडित आहे. हा आजार भूतकाळातील घटन वाईट प्रसंगाने होतो. त्यामुळे ती व्यक्ती जुन्या आठवणीतून बाहेर पडत नाही. चला तर जाणून घेऊया या आजाराविषयी. या आजाराला ‘शेल शॉक’ किंवा ‘ बँटल फेटीग सिंड्रोम ‘ पण म्हणतात. हा आजारही कोणत्याही गंभीर परिस्थितीपेक्षा कमी नाही. कधी आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात, ज्याचे घाव आपल्या मनावर वर्षानुवर्षे असतात. असे मनावर झालेले आघात विसरण तर कठीण असतच. पण त्यामुळे होणारा मानसिक त्रास जास्त असतो. आपल्या जवळच्या माणसाचं अचानक निधन, डोळ्यासमोर झालेला अपघात जसा आपल्या काळजाचा ठोका चुकवतो तसाच तो आपल्या मनावर खूप खोलवर परिणाम करुन जातो.

यामध्ये ती व्यक्ती त्या वाईट घटनेला विसरू शकत नाही. सर्वात वाईट म्हणजे ती व्यक्ती स्वतःल ही ईजा पोचवते. त्यामुळे पीटीएसडी अत्यंत आव्हानात्मक आहे. या आजाराची अनुभवरुपी लक्षण असतात. या रूग्णांना नेहमी वाईट स्वप्न पडतात. या स्वप्नांमुळे ती व्यक्ती त्या वाईट आठवणीतच बंदिस्त राहतात. त्यात त्या घटनांची आठवण येत राहणे.

आठवणींना जागृत करणाऱ्या लक्षणांमध्ये

ज्या घटनेमुळे त्या व्यक्तीच्या मनावर सखोल परिणाम झाला. तीच घटना नेहमी नेहमी आठवण येत असल्याने ती व्यक्ती त्या ट्रॉमातून बाहेर येत नाही. लक्ष केंद्रीत न होणे या आजाराचे लक्षण आहे. यामध्ये रूग्ण कोणतेही काम कामावर लक्षपूर्वक करू शकत नाही. भूतकाळात घडलेल्या घटनाक्रमातून बाहेर पडू न शकल्याने त्यांना एकाग्र होणे जमत नाही. रूग्ण कायम चिडचिडेपणा करतो. ती व्यक्ती इतकी चिडचिडी होते की कुणाशी धड बोलत नाही. त्या घटनेवर बोलणे तिला आवडत नसल्याने ती व्यक्ती सरळ बोलणेच टाळते. पँनिक अटँक येणे- या आजारात रूग्णाला पँनिक अटँक येतात. ती व्यक्ती पुन्हा त्या जुन्या आठवणीत हरवते. रोजच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासतही तिला अडचण वाटते.

या आजाराचा ईलाज मनोविकारतज्ज्ञच करू शकतात. शिवाय काही थेरेपीज फायदेशीर ठरतात. या रूग्णांना समुपदेशन, संमोहन आणि औषधी आवश्यक आहेत.

वर्तन थेरेपी (Behavioural Therapy ): या थेरेपीने व्यक्तीसोबत त्याच वाईट घटनेवर थेट संवाद साधता येतो. त्या व्यक्तीला समजून घेण्यास मदत होते. त्याच्या मनातून नकारात्मक विचार किंवा भीती काढण्याचा प्रयत्न होतो.

ट्रॅमा-फोकस्ड कॉग्निटिव्ह रिहेबिलिव्हल थेरपी (टीएफ-सीबीटी) – ही थेरेपी रुग्णाला ज्या घटनेमुळे आघात पोचला तिच्या संबंधित आहे. या थेरेपीने ती व्यक्ती मनमोकळी होते.

रीप्रोसेसिंग थेरेपी – यामध्ये व्यक्तीला एक बोट बघून त्या वाईट घटनेवर बोलायला सांगितले जाते. असे म्हणतात की ही थेरेपी या आजारापासून त्या व्यक्तीला बाहेर काढण्याची फायदेशीर सर्वोत्तम पद्धत आहे.

इतर बातम्या –

वेडिंग सीझन सुरू, या खास क्षणी त्वचेला उजळण्यासाठी उपाय काय? वाचा सविस्तर

Nanded Doctor: रुग्णांचा त्रास समजून घेण्यासाठी त्यांनी केली सेल्फ एंडोस्कोपी, इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.