कोरोनाची लक्षणं नाहीत, मग लहान मुलांना अॅडमिट कधी करायचं, वाचा डॉक्टर काय सांगतात…
पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri chinchwad) गेल्या बारा दिवसात एक हजाराहुन अधिक मुलांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. हे प्रमाण अधिक असले तरी पालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केले आहे.
मुंबई : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri chinchwad) गेल्या बारा दिवसात एक हजाराहुन अधिक मुलांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. हे प्रमाण अधिक असले तरी पालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केले आहे. तीन दिवस ताप-खोकला असेल, मुले चिडचिड करत असतील किंवा मुलांना धाप लागत असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करा. असे आवाहन आता डॉक्टरांकडून केले जात आहे. कोरोना झालेल्या मुलांवर उपचार करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे डॉक्टर रोहित पाटील यांनी ही माहीती दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1023 मुलांना कोरोनाची लागण
पिंपरी चिंचवड शहरामध्ये दहा दिवसात 18 वर्षापर्यंतच्या 1023 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या दहा दिवसात कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 10 पटीने वाढलीये. या वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मुलांचा ही समावेश लक्षणीय आहे. 1 ते 11 जानेवारी दरम्यान शहरात 8783 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आरोग्य यंत्रनेचा ताण चांगलाच वाढलाय.
#PCMCCOVID19 #UpdatedReports पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड-19 संदर्भातील महत्त्वाची माहिती. दिनांक 12/01/2022 वेळ दुपारी 4:00 वा. पर्यंतची आकडेवारी.#PCMCFightsCorona #COVID19 #pcmcsmartsarathi pic.twitter.com/jM3HFtoYHc
— PCMC Smart Sarathi (@PCMCSarathi) January 13, 2022
विशेष म्हणजे 8783 नव्या कोरोना रूग्णांमध्ये 1023 मुलांचा समावेश आहे. वयोगटानुसार पाहिले तर 0 ते 5 वयोगटातल्या 166 मुलांना, 6 ते 12 दरम्यान 388 मुलांना तर 13 ते 18 वयोगटादरम्यान 469 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. म्हणजेच शहरात जवळपास ऐकून रुग्णांपैकी 11.64 टक्के रुग्ण 0 ते 18 वयोगटातील आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतः ची आणि मुलांचीही काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ही एक धोक्याचीच घंटा आहे.
मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढला
15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण वेगाने करण्यात येत आहे. राज्यातील 60 लाख मुलांचे लसीकरण करायचे आहे. दररोज 3 लाख मुलांचे लसीकरण याप्रमाणे प्रयत्न करण्यात येत आहेत. 15 ते 20 दिवसांमध्ये हे लसीकरण होऊन जाईल. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचे असेल तर कुठे जायचे असेल तर लसीकरण करुन घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक त्यामुळे लसीकरण करुन घ्या, असं आवाहन आरोग्य मंत्र्यांकडून देखील केले जात आहे.
संबंधित बातम्या :
तोल जातोय.. एक हात निष्क्रिय वाटतोय ? वेळीच सावध व्हा, ती या आजाराची तर लक्षणे नाहीत?