Health | सर्दी, खोकला आणि तापीवर उपचार करण्यासाठी हे घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर, वाचा आणि निरोगी राहा!
सर्दी आणि खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कोमट दुधात हळद मिसळून प्या. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हळद आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करते. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यास मदत करते.
मुंबई : पावसाळ्याच्या हंगामाला (Rainy season) आता सुरूवात झालीये. उकाड्यापासून आराम मिळालायं. मात्र, पाऊस आपल्यासोबत अनेक रोगांना देखील घेऊन येतो. पावसाळ्याच्या हंगामात थंडी वाढल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या (Problem) निर्माण होतात. विशेष करून ताप, सर्दी आणि खोकला. सर्दी, ताप आणि खोकला आल्यावर प्रत्येकवेळी डाॅक्टरांकडे जाण्याची अजिबात गरज नाही. आपण काही खास घरगुती उपाय करूनही सर्दी, ताप यांची समस्या दूर करू शकतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, मध, हळद आणि आले आपल्या आहारासाठी अत्यंत फायदेशीर (Beneficial) आहेत. पावसाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात मध, हळद यांचा जास्तीत जास्त समावेश करायला हवा.
सूप
पावसाळ्याच्या थंड वातावरणामध्ये सूपचे सेवन करणे फायदेशीर ठरते. सर्दी, ताप आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आहारामध्ये सूपचा समावेश करा, शक्यतो सूप गरमा-गरमच प्या. सूपमध्ये जास्तीत-जास्त भाज्या टाकण्याचा प्रयत्न करा. सूपमध्ये भरपूर प्रमाणात पोषणतत्व असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक आरोग्य फायदे मिळतात. सर्दी आल्यावर चिकन सूप, पालक, टोमॅटो आणि विविध भाज्यांचे सूप प्या. सर्वात महत्वाचे म्हणजे सूप कोणताही असो, त्यामध्ये आठवणीने आले टाका.
हळदीचे दूध
सर्दी आणि खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कोमट दुधात हळद मिसळून प्या. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हळद आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करते. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यास मदत करते. सध्याच्या पावसाळ्याच्या हंगामात दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद टाका आणि प्या. यामुळे सर्दीपासून आपले संरक्षण होतेच, शिवाय झोपही शांत लागण्यास मदत होते.
काळी मिरीचा चहा
काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आरोग्य निरोगी ठेवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत काळी मिरी फायदेशीर ठरते. काळ्या मिरीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ते संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी काम करतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. यामुळे सर्दी आणि खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी एक कप चहामध्ये काळी मिरी आणि चिमूटभर मीठ मिसळून प्या. तसेच आपण एखादी काळी मिरी चघळून देईल खाऊ शकतो. मात्र, पावसाळ्याच्या हंगामात चहा पिण्याचे प्रमाण अधिक होते. अशावेळी आपण चहामध्ये काळी मिरी टाकून प्यायला हवे.