या 4 सुपरफूड्सचा डाएट मध्ये करा समावेश, केसांच्या वाढीसाठी उपयुक्त!
तुम्हाला हेल्दी डाएट घेण्याची गरज आहे कारण तुम्ही जे काही खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर, त्वचेवर आणि केसांवर होतो. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे केसांची गुणवत्ता आणि वाढीला चालना देतात त्यांचा आहारात समावेश करून त्यांना प्रोत्साहन देतात, तर चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत...
मुंबई: आजच्या काळात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढत्या प्रदूषणामुळे केस खराब होणे ही एक सामान्य समस्या आहे. विशेषत: केस गळणे आणि पातळ होणे ही हळूहळू मोठी समस्या बनत चालली आहे. अशा वेळी तुम्हाला हेल्दी डाएट घेण्याची गरज आहे कारण तुम्ही जे काही खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर, त्वचेवर आणि केसांवर होतो. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे केसांची गुणवत्ता आणि वाढीला चालना देतात त्यांचा आहारात समावेश करून त्यांना प्रोत्साहन देतात, तर चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत…
केसांच्या वाढीसाठी उपयुक्त पदार्थ
जांभूळ
व्हिटॅमिन सी सारख्या शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असणारं जांभूळ! केसांच्या मुळांचे नुकसान आणि फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्याच वेळी, आपले केस जर तुटत असतील तर त्यावर हे एक सुपरफूड आहे असं म्हणायला हरकत नाही.
ड्रायफ्रुट्स
बदाम, काजू आणि अक्रोड सारख्या ड्रायफ्रूटमध्ये बायोटिन किंवा व्हिटॅमिन बी 7 सारखे गुणधर्म असतात जे आपल्या केसांची गुणवत्ता सुधारतात, आपले केस लांब आणि दाट बनवतात. त्याचबरोबर शेंगदाणे खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजार आणि शरीरात जळजळ होण्याचा धोका कमी होतो.
फ्लॅक्ससीड्स
यात कॅलरी कमी असतात, म्हणून ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. आपण स्मूदी किंवा स्नॅक म्हणून या बियाण्याचे सेवन करू शकता. त्यांचे सेवन केल्याने आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहते.
पालक
पालक व्हिटॅमिन ए, सी, लोह, प्रथिने आणि फोलेट सारख्या गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे केसांच्या वाढीस चालना देते. अनेकदा शरीरात रक्ताची कमतरता हे देखील केस गळण्याचे एक प्रमुख कारण असते, त्यामुळे पालकाचे सेवन केल्यास तुम्हाला निरोगी केस मिळू शकतात.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)