National Nutrition week 2021 : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात ‘या’ 5 गोष्टींचा समावेश करा!
राष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो. यावर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताह 1 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे आणि 7 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. त्याचा उद्देश लोकांना आरोग्य आणि पौष्टिक आहाराबद्दल जागरुक करणे आहे. कोरोमामुळे बहुतेक लोक त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत.
मुंबई : राष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो. यावर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताह 1 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे आणि 7 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. त्याचा उद्देश लोकांना आरोग्य आणि पौष्टिक आहाराबद्दल जागरुक करणे आहे. कोरोमामुळे बहुतेक लोक त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत. या दरम्यान, निरोगी अन्न आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला आहे. (Include these 5 things in your diet to boost your immune system)
जगभरातील तज्ज्ञांच्या मते, महामारी टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. काही लोकांची रोगप्रतिकारक शक्ती जन्मापासूनच मजबूत असते. त्याच वेळी, काही लोक आहार आणि व्यायामाद्वारे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचा प्रयत्न करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
पाणी प्या
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. पुरेसे पाणी पिणे चयापचय सुधारते. हे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. या गोष्टी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
हिरव्या भाज्या खा
तुम्ही कधी विचार केला आहे की पालक हिरव्या भाज्या खाण्याची शिफारस का करतात? कारण या गोष्टी तुमचा पौष्टिक आहार वाढवण्यास मदत करतात. हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने भरपूर असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
प्रोबायोटिक्स खा
तुम्हाला माहित आहे का की रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी निरोगी आतडे महत्वाची भूमिका बजावतात? अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, आतडे चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करतात आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. म्हणूनच पोषणतज्ञ दही, ताक, लस्सी खाण्याची शिफारस करतात.
फळे खा फळे एक सुपरफूड आहेत. जी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहेत. निरोगी राहण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. फळे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे आपले पोट दीर्घकाळ भरून ठेवण्यास मदत करते.
औषधी वनस्पती, मसाले आणि काढा
दालचिनी, जिरे, हळद यासह इतर मसाले रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. या गोष्टी अन्नाची चव वाढवतात तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. साथीच्या या काळात बहुतेक लोक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डेकोक्शन, हर्बल टी घेतात. या गोष्टींमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Include these 5 things in your diet to boost your immune system)