जिमवरून आल्यावर ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा आणि झटपट वजन कमी करा!

जर तुम्ही वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिमला जात असाल तर जिमवरून आल्यानंतर आपण आहारात काय घेतो हे सर्वात महत्वाचे आहे. कारण त्यादरम्यान आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते

जिमवरून आल्यावर 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा आणि झटपट वजन कमी करा!
जिम
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 4:36 PM

मुंबई : जर तुम्ही वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिमला जात असाल तर जिमवरून आल्यानंतर आपण आहारात काय घेतो हे सर्वात महत्वाचे आहे. कारण त्यादरम्यान आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असलेली ग्रीन कॉफी शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यात मदत करते. जर तुम्ही जिमला जात असाल तर  सकाळी उपाशी पोटी आणि दुपारी जेवणापूर्वी याचं सेवन करा. (Include these foods in the diet after coming out of the gym)

ग्रीन कॉफी पिल्यानंतर जवळपास अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका. जर तुम्हाला जास्त वजन कमी करायचं नसेल तर सकाळी एकदा याचं सेवन करा. लठ्ठपणा कमी करण्यासाठी चणे खाणे खूप फायदेशीर आहे. कारण चण्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स असते, जे भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करते. यामुळे ज्या लोकांना लठ्ठपणा कमी करायचा आहे त्यांनी आपल्या आहारात चणे घ्यावेत. आपण बऱ्याच वेळा स्नॅक्समध्ये वेगवेगळे पदार्थ खातो.

स्नॅक्समध्ये ओटस घ्यावे आणि त्यामध्ये अक्रोड मिक्स करून खावे. अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक देखील लागत नाही. अक्रोड खाल्ल्याने आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते. अक्रोड खाल्ल्याने आपले चयापचय वाढते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. दररोज अक्रोड खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो. डाळी, शाकाहारी लोकांसाठी प्रथिने बनविण्याचा एक चांगला स्रोत आहे, जे शिजविणे सोपे आणि स्वादिष्ट आहे.

वेगवेगळ्या डाळी आपण आहारात घेतल्या पाहिजेत. मूग आणि हरभरा डाळीमध्ये पोषक घटक आणि प्रथिने असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर जिमला जात असाल तर आहारात डाळींचा समावेश करा. एक कप डाळीत 18 ग्रॅम प्रथिने आणि 16 ग्रॅम फायबर असते. यामुळे आपले पोट बऱ्याच काळ भरल्यासारखे वाटते आणि बद्धकोष्ठतेची समस्या यामुळे दूर होते. अंडी अनेक पोषक घटक आणि प्रथिने समृद्ध असतात. जे आपल्या शरीरास योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

(टीप : कोणतेही व्यायामप्रकार करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Makeup Tips | वयाच्या चाळीशीतही सुंदर दिसायचंय? तर मेकअप करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात!

Fitness | वयाच्या 60व्या वर्षीही राहाल तंदुरुस्त, जाणून घ्या ‘या’ योगासनांबद्दल…

(Include these foods in the diet after coming out of the gym)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.