Weight Loss | वजन कमी करायचे आहे पण भूक कंट्रोल होत नाहीये? मग या पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा!
अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात असतात. यामुळे आपल्याला बराच वेळ भूकही लागत नाही. तुम्ही नाश्त्यात अंडी खाऊ शकता जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर अंडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. आपण त्यात काही भाज्या घालू शकता. याशिवाय तुम्ही आमलेट, भुर्जी वगैरे खाऊ शकता.
मुंबई : वाढते वजन (Weight) ही अनेकांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आज सर्वचजण मरमर करत आहेत. यासाठी विविध डाएट फाॅलो करणे असो किंवा जिम लागणे असो. मात्र, हे सर्व करूनही वजन काही केल्या कमी होत नाहीये. कारण अनेकांना एकदा भूक लागली की, खाण्यावर नियंत्रण (Control) ठेवता येत नाही. परिणामी आपले वजन झपाट्याने वाढते. त्यामध्येही वजन वाढण्याची खरी समस्या ही लॉकडाऊनमध्ये सुरू झाली. घरातून कामामुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढले आहे. वजन कमी करण्यासाठी वर्कआउट्स (Workouts) तर सुरू केलेच आहे. पण भूकेवर नियंत्रण ठेवता येत नसल्याने वजन वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही खास पदार्थांबद्दल सांगणार आहोत. जे तुमच्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊयात हे पदार्थ नेमके कोणते आहेत.
डार्क चॉकलेट
तुम्हाला जाणून आर्श्चय वाटेल पण डार्क चॉकलेट भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. डार्क चॉकलेट देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. चॉकलेटमध्ये बरेच पौष्टिक घटक आढळतात, विशेषत: डार्क चॉकलेट, ज्यामध्ये भरपूर कोको आणि फायबर असतात. यामुळे आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही. यामुळे ज्यांना भूक नियंत्रणात ठेवता येत नाही. त्यांनी आपल्या आहारामध्ये डार्क चॉकलेटचे सेवन करावे.
अंडी
अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात असतात. यामुळे आपल्याला बराच वेळ भूकही लागत नाही. तुम्ही नाश्त्यात अंडी खाऊ शकता जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर अंडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. आपण त्यात काही भाज्या घालू शकता. याशिवाय तुम्ही आमलेट, भुर्जी वगैरे खाऊ शकता. दररोज सकाळी जर तुम्ही तीन अंडी खाल्ली तर तुम्हाला बऱ्याच वेळ अजिबात भूक लागणार नाही.
दही
दही आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. दह्यामध्ये जास्त प्रथिने आणि कमी कार्ब्स असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय दही खाल्ल्याने आपल्याला बऱ्याच वेळ भूकही लागत नाही. दह्यामध्ये पाचक प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. उन्हाळ्यात हे खाल्ल्याने पोट थंड राहते.
ओटमील
ओटमील एक निरोगी आणि स्वादिष्ट नाश्ता आहे. त्यात कॅलरीज कमी, फायबर आणि प्रथिने जास्त असतात. यामुळे याचे सेवन केल्याने आपल्याला बऱ्याच वेळ भूक लागत नाहीत. ओट्समध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे तुमच्या अन्नाची इच्छा कमी होते. हे पचन प्रक्रिया मंद करते, ज्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही. यामुळेच ओटमीलचा नाश्त्यामध्ये समावेश करायला हवा.