Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : डेंग्यू ताप टाळण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, यामुळे प्लेटलेट देखील कमी होणार नाहीत!

दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यावर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे आजार डोकेवर काढतात. डेंग्यूमध्ये ताप येतो आणि विसनेस प्रचंड जाणवतो. डेंग्यूची लागण झाल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. अशा परिस्थितीत जर डेंग्यूच्या रुग्णांनी योग्य आहार घेतला नाही तर धोका निर्माण होऊ शकतो.

Health Tips : डेंग्यू ताप टाळण्यासाठी आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा, यामुळे प्लेटलेट देखील कमी होणार नाहीत!
डेंग्यूचे रुग्ण वाढले.
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 3:14 PM

मुंबई : दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यावर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे आजार डोकेवर काढतात. डेंग्यूमध्ये ताप येतो आणि विसनेस प्रचंड जाणवतो. डेंग्यूची लागण झाल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. अशा परिस्थितीत जर डेंग्यूच्या रुग्णांनी योग्य आहार घेतला नाही तर धोका निर्माण होऊ शकतो. योग्य प्रमाणात पौष्टिक आहार घेऊन डेंग्यू बरा होतो. (Include these in your diet to prevent dengue fever)

पपईचा रस

पपईची पाने नीट धुवून बारीक चिरून घ्या. यानंतर, मध्यम आकाराचे पपई घ्या आणि बारीक कापून घ्या. आता त्यात लिंबाचा रस आणि अर्धा कप संत्र्याचा रस मिक्स करा. या सर्व गोष्टींमध्ये थोडे पाणी घालून रस तयार करा. लक्षात ठेवा की हा रस नेहमी ताजा प्या.

नारळ पाणी

नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे पेय प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. डेंग्यूच्या तापामध्ये काहीही खाऊ किंवा पिऊ वाटत नाही . नारळाचे पाणी या समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

डाळिंबाचा रस

शरीरातील रक्त वाढवण्यासाठी डाळिंबाचा रस प्यावा. डाळिंबामध्ये नैसर्गिकरित्या खनिजे असतात जी शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. जे प्लेटलेट वाढवण्यास मदत करते. अशा प्रकारे डेंग्यू आणि मलेरियाच्या डासापासून बचाव करा

1. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा. कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम भांड्यात पाणी जमा करू नका. यामध्ये डेंग्यू-मलेरियाच्या डासांची पैदास सुरू होते.

2. आपल्या बागेत किंवा टेरेसमध्ये सर्व कंटेनर किंवा रिकामी भांडी झाकून ठेवा. आपण त्यांना उलटे ठेवू शकता. याशिवाय पाणी असलेली भांडी स्वच्छ ठेवा.

3. घरातून बाहेर पडताना पूर्ण बाहीचे कपडे घालावेत जेणेकरून डासांचा संपर्क कमी होईल.

4. डास टाळण्यासाठी फवारण्या, क्रीम आणि जाळी वापरा. जर तुम्ही बाहेरच्या खोलीत झोपत असाल तर मच्छरदाणी वापरा.

5. संध्याकाळी दरवाजे आणि खिडक्या बंद करा.

6. जर आवश्यक नसेल तर विनाकारण फिरणे टाळा. असे केल्याने तुम्ही डेंग्यूचा धोका कमी करू शकता.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Include these in your diet to prevent dengue fever)

कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.