हिवाळ्यात या मिठाईंचा करा आहारात समावेश; रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबतच शरीर राहील उबदार
हिवाळ्यामध्ये भारतातील जवळपास सर्वच घरामध्ये मोठ्या प्रमाणात लाडू, चिक्की, मिठाई बनवल्या जातात. या मिठाई केवळ चविष्ट नसून त्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जाणून घेऊया अशाच काही मिठाईंबद्दल ज्या हिवाळ्यात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
हिवाळा हा ऋतू अनेकांच्या आवडीचा ऋतू आहे. पण हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हिवाळा ऋतू म्हणजे फक्त उबदार कपडे घालणे असे नाही. आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या ऋतूंमध्ये अनेक घरांमध्ये विशिष्ट पदार्थ तयार केले जातात आणि खास करून या थंडीच्या वातावरणात मिठाईचा मोठ्या प्रमाणात आनंद घेतला जातो. हिवाळ्यात अनेक प्रकारच्या मिठाई बनवल्या जातात. त्यांचे नाव जरी ऐकले तरी त्या खाण्याची इच्छा होते. अनेक जण या मिठाई खाण्यासाठी हिवाळा ऋतूची वाट पाहत असतात. या मिठाई चविष्ट आण्यासोबतच आरोग्यासाठी ही भरपूर फायदेशीर आहे. या मिठाईमध्ये अनेक पोषक तत्वे असतात ज्याचा आरोग्याला फायदा होतो.
हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स, नट्स, हिरव्या पालेभाज्या या प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये नक्कीच असतात. कारण हिवाळ्यामध्ये पालेभाज्या अनेक जण आवडीने खातात तर या दिवसांमध्ये त्या जास्त चविष्ट लागतात. या सोबतच काही प्रकारच्या मिठाई हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. जाणून घेऊया हिवाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या मिठाई बद्दल.
तिळाचे लाडू
हिवाळ्यामध्ये तिळाच्या लाडूचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्या जाते. त्याचा आरोग्यालाही मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तीळ हे पोषक तत्त्वांनी समृद्ध असण्यासोबतच उष्ण आहेत. तीळ खाल्ल्याने शरीरातील तापमान वाढते. त्यामुळे हिवाळ्यात हे लाडू खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात अनेक जण तिळाचे लाडू , ड्रायफ्रूट्स, खोबरे हे टाकून बनवतात तर काही ठिकाणी फक्त गुळ आणि तिळाचे लाडू बनवले जातात.
गाजराचा हलवा
हिवाळा म्हटलं की सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतो तो गाजराचा हलवा. गाजराचा हलवा अनेक जणांच्या आवडीचा पदार्थ आहे आणि खास करून तो हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. गाजर हे पोषक तत्त्वांनी समृद्ध असले तरी त्यात सुकामेवा टाकल्याने आरोग्यासाठी आणखीन फायदेशीर बनतो. या सोबतच जर तुम्ही गाजराचा हलवा बनवत असाल तर त्यामध्ये थोडी कमी साखर टाका किंवा साखरेची कॅन्डी वापरा यामुळे तो आरोग्यदायी बनेल.
जवसाचे लाडू
जवसाच्या लाडू बद्दल अनेकांना माहिती नाही. पण जवसाचे लाडू हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. अनेकांच्या घरी ते हिवाळ्यात बनवले जातात. कारण हा लाडू रोज एक खाल्ल्यास थंडीपासून बचाव होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
गुळाची खीर
खीर अनेकांनाच आवडते आणि खीर बनवण्याचे अनेक प्रकार आहे. पण हिवाळ्यामध्ये खास करून गुळाची खीर बनवली जाते. त्याची चव अप्रतिम असतेच याशिवाय त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. जे हिवाळ्यामध्ये शरीरासाठी फायदेशीर असतात.
तिळगुळाची चिक्की
हिवाळ्यामध्ये अनेकजण मोठ्या प्रमाणात गूळ आणि तीळ खातात. गुळ आणि तीळ हे दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने हिवाळ्यात ते खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे तिळगुळाची चिक्की हिवाळ्यात खाल्ली जाते.
मूग डाळीचा हलवा
हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मूग डाळीचा हलवा खाल्ल्या जातो. हलवा खाण्याचा आनंद हिवाळ्यात काही वेगळाच असतो. हिवाळ्यामध्ये बहुतेक घरांमध्ये हा हलवा बनवला जातो. मुगाच्या डाळीत असलेले प्रथिने आणि गावरान तुपातील पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात.