Vitamin C : ‘या’ एकाच जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे गंभीर आजार, वाचा सविस्तर!
निरोगी शरीर ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. आपल्या शरीराला प्रत्येक जीवनसत्वाची गरज असते. ही जीवनसत्त्वे अन्नाद्वारे शरीराला मिळतात. व्हिटॅमिन सी हे एक असे जीवनसत्व आहे, जे आपल्या निरोगी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
मुंबई : निरोगी शरीर ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. आपल्या शरीराला प्रत्येक जीवनसत्वाची गरज असते. ही जीवनसत्त्वे अन्नाद्वारे शरीराला मिळतात. व्हिटॅमिन सी हे एक असे जीवनसत्व आहे, जे आपल्या निरोगी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शरीरात कोलेजनच्या योग्य निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. हाडांच्या विकासासाठी, रक्तवहिन्यासंबंधी आरोग्य आणि जखमेच्या उपचारांसाठी हे महत्वाचे आहे.
1. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हिरड्या दुखणे, हिरड्यांमधून रक्त येणे, अशक्तपणा, थकवा, पुरळ आणि बऱ्याच समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे थकवा, भूक न लागणे, चिडचिडा स्वभाव आणि सांधेदुखी यांसारखी अनेक लक्षणे दिसू शकतात. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सीचा समावेश करावा.
2. आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समाविष्ट करणे खूप महत्वाचे आहे. इतर फायद्यांमध्ये व्हिटॅमिन सी लोह शोषून घेण्यास मदत होते. जे तुमच्या शरीरातील लाल रक्तपेशींच्या संख्येत घट झाल्यामुळे होणारे अशक्तपणा दूर करण्यास मदत करते. अशक्तपणामुळे थकवा, निस्तेज त्वचा, धाप लागणे, चक्कर येणे, वजन कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होतात.
3. लिंबू, संत्री आणि मोसंबी यांचा समावेश आपल्या आहारात करा. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबू सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते.
4. लाल शिमला मिरचीमध्ये जीवनसत्त्वे सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि बीटा कॅरोटीन यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. लाल शिमला मिरचीमध्ये कॅलरी मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. व्हिटॅमिन सीचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!