पाकिस्तानात चुलत भाऊ-बहिणीच्या विवाहांमध्ये वाढ, होणाऱ्या मुलांना होतात हे विकार
पाकिस्तान हा देश सध्या अनेक संकटांना तोड देत आहे. एकीकडे इतकी मोठी संकट असताना दुसरीकडे चुलत भाऊ-बहिणीचा विवाहाचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. भारतात देखील मुस्लीम लोकं अशा प्रकारे लग्न करतात. पण यामुळे होणाऱ्या बाळाला हे मोठे विकार होऊ शकतात.
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये चुलत भाऊ आणि बहिणी यांच्यात विवाह होण्याच्या घटना वाढत आहेत. पण असे केल्याने भविष्यात मोठी अडचण होऊ शकते. याबाबत चिंता व्यक्त करताना तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, चुलत भाऊ-बहिणीचा विवाह जर होत राहिले तर यामुळे जनुकीय विकार वाढू शकतात. डोव्ह युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस (DUHS)च्या तज्ज्ञांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये चुलत भाऊ-बहिणीच्या विवाहाच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली आहे.
जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, डॉ. अँटोनारकिस म्हणाले की, एकाच रक्तातील लोकांमध्ये जर विवाह झाला तर यामुळे सर्वात मोठा धोका हा आहे की ते अनुवांशिक विकारांवर भार टाकू शकतात. जेथे चुलत भाऊ-बहिणीचे विवाह होतात तेथे हे दर जास्त आहेत.
पाकिस्तानातील एकूण विवाहांपैकी सुमारे 65 टक्के विवाह हे चुलत भाऊ-बहिणीमध्ये होतात. काही समुदायांमध्ये चुलत भाऊ-बहिणाच्या भावाच्या विवाहाचे प्रमाण ८५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. पण यामुळे लहान मुलांमध्ये रेक्सेटिव्ह आणि प्रबळ जनुकीय विकारांचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो,” असे तज्ज्ञांचे मत आहे.
जिनेव्हा विद्यापीठातील डॉ. स्टाइलियानोस यांनी सांगितले की, 2,980 जीन्स रेक्सेटिव्ह रोगांशी संबंधित आहेत. पाकिस्तानात जर असे चुलत भाऊ-बहिणींमध्ये लग्नाचे प्रमाण वाढले तर जनुकीय विकार वाढू शकतात. सरकारने याकडे लक्ष द्यावे, असे मत तज्ज्ञांनी एकमताने मत व्यक्त केलंय.
प्रोफेसर सईद म्हणतात की, ज्या कुटुंबांमध्ये आपापसात विवाह होतात. त्यांना थॅलेसेमिया, मायक्रोसेफली यांसारखे अनुवांशिक रोग होणे सामान्य आहे. पाकिस्तानमध्ये चुलत भाऊ-बहिणीच्या विवाहाचे वाढते प्रमाण पाहता सरकारच्या हस्तक्षेपाची गरज असल्याचे ते म्हणाले.
थॅलेसेमिया हा एक रक्ताशी संबंधित विकार आहे. या विकारात लाल रक्तपेशी तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. तर मायक्रोसेफली या विकारात होणाऱ्या बाळाचे डोके लहान असते. कारण आई-वडिलांकडून जनुकाची सदोष आवृत्ती त्या बाळात देखील येते. त्यामुळे अव्यवस्थित अनुवांशिक विकार उद्भवतात. याशिवाय इतर प्रबळ अनुवांशिक विकार देखील मुलांना होऊ शकतात.