Corona New Variant : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा वेरिएंट, भारत सरकार सतर्क, राज्यांना महत्त्वाचे आदेश

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना विषाणूचा नवा वेरिएंट (Corona New Variant) आढळला आहे. या नव्या वेरिएंटमुळं 100 हून अधिक लोक संक्रमित झाले आहे. कोरोनाचा नवा वेरिएंट समोर आल्यानंतर दक्षिण आफ्रिका सरकार अलर्ट झालं आहे.

Corona New Variant : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा वेरिएंट, भारत सरकार सतर्क, राज्यांना महत्त्वाचे आदेश
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 7:43 AM

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना विषाणूचा नवा वेरिएंट (Corona New Variant) आढळला आहे. या नव्या वेरिएंटमुळं 100 हून अधिक लोक संक्रमित झाले आहे. कोरोनाचा नवा वेरिएंट समोर आल्यानंतर दक्षिण आफ्रिका सरकार अलर्ट झालं आहे.तिथल्या सरकारनं प्रयोगशाळांच्या सहकार्यानं नव्या वेरिएंटनं संसर्गित होणाऱ्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा नवा वेरिएंट किती संक्रामक आणि धोकादायक आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या द नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेशन डिसीजच्या माहितीनुसार हा वेरिएंट संक्रामक असू शकतो. भारत सरकार (India Government Alert) यामुळं अलर्ट झालं आहे. भारतानं सर्व आंतररराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचाणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या राज्य सरकारांना सूचना

एनसीआडीनं नवी कोरोना वेरिएंटचं नाव B.1.1.529. असल्याचं म्हटलं आहेय दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं NGS-SA च्या सदस्य असणाऱ्या सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांना तात्काळ जिनोम सिक्वेसिंग करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा नवा संक्रामक किती घातक आहे याची तपासणी करण्याचा हेतू या मागे आहे. भारत सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूष यांनी दक्षिण आफ्रिकेतील नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळं व्हिसा संबंधी आणि देशात येण्यासाठी देण्यात आलेली सूट यामुळं देशासमोरील अडचणी वाढू शकतात त्यामुळं परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.

परदेशातून येणाऱ्या लोकांचं ट्रॅकिंग करण्याचे आदेश

भारत सरकारच्या आरोग्य सचिवांनी परदेशातून आलेल्या लोकांचं ट्रॅकिंग करण्यास सांगितलं आहे. जे लोक दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना किंवा हाँगकाँग येथून येतात त्यांची आरोग्य चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय त्यांचे नमुने घेऊन INSOCAG येथे जिनोम सिक्वेंसिग साठी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना नियमांचं पालन करण्याचे आदेश

आफ्रिकेतील एनसीआयडीचे डॉ. मिशेल ग्रमु यांनी लोकांना नव्या वेरिएंटपासून संसर्गित होण्यापासून स्वत: चा बचाव करण्यास सांगितलं आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनावरील लस घेतली असली तरी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं देखील पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचां आवाहन करण्यात आलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा नवा वेरिएंट किती धोकादायक आहे हे माहिती नसल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

‘ठाकरे सरकार घरात लपले, तेव्हा कोरोनाच्या कडेलोटातून केंद्राने सावरले’, भाजपा खासदार डॉ. हीना गावित यांचा घणाघात

केंद्राचा वीज क्षेत्राच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडा, ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा हल्लाबोल

Indian Health Ministry issue alert to after new corona variant found in South Africa

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.