भारतीय करतात 9 तांसांहून अधिक काम, 50 टक्के लोकांना कानदुखीचा त्रास, पाहा काय सांगतोय अभ्यास…

गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयसने घर आणि संस्था यांमधील भारतातील आघाडीचा फर्निचर ब्रँड असणाऱ्या गोदरेज इंटेरिओ या आपल्या व्यवसाय शाखेने केलेल्या ‘द रिअल वर्ल्ड रीपर्कशन्स ऑफ व्हर्च्युअल फटिग’ या संशोधनातील निष्कर्ष जाहीर केले आहेत.

भारतीय करतात 9 तांसांहून अधिक काम, 50 टक्के लोकांना कानदुखीचा त्रास, पाहा काय सांगतोय अभ्यास...
आरोग्य
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 11:23 AM

मुंबई : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयसने घर आणि संस्था यांमधील भारतातील आघाडीचा फर्निचर ब्रँड असणाऱ्या गोदरेज इंटेरिओ या आपल्या व्यवसाय शाखेने केलेल्या ‘द रिअल वर्ल्ड रीपर्कशन्स ऑफ व्हर्च्युअल फटिग’ या संशोधनातील निष्कर्ष जाहीर केले आहेत. कर्मचाऱ्यांचे काम व्हर्च्युअलीच चालू असल्यामुळे त्यांना ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे ती समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी गोदरेज इंटेरिओच्या वर्कस्पेस आणि एर्गोनॉमिक्स संशोधन विभागाने राष्ट्रीय पातळीवर एक संशोधन अभ्यास केला आहे. (Indians do more than 9 hours of work, 50 percent of people suffer from earache, see what the study says)

एकूण 235 कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी या संशोधनात भाग घेतला. त्यापैकी 68 टक्के कर्मचारी 26 ते 40 या वयोगटातील होते. त्यापैकी बहुतांश जण बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आणि भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत आहेत. सततच्या स्क्रीनमुळे येणारा व्हिज्युअल थकवा, कानांना जाणवणारा थकवा, एकूणच शारीरिक थकवा आणि मानसिक थकवा या सगळ्याचा व्हर्च्युअल फटीगमध्ये अंतर्भाव होतो. व्हर्च्युअल बैठकांमध्ये अनियमीत सहभागामुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ होत आहे.

दीर्घकाळ चालणाऱ्या बैठकांसाठी एका जागेवर खूप वेळ बसून राहण्यामुळेही अंगदुखीत वाढ होत आहे. हा व्हर्च्युअल फटीगचाच परिणाम आहे. गोदरेज इंटेरिओच्या विपणन (बी टू बी) विभागाचे सहयोगी उपाध्यक्ष समीर जोशी म्हणाले, “कोव्हीड 19 ची आलेली दुसरी लाट आणि संभाव्य तिसरी लाट यामुळे व्हर्च्युअल कामकाज बैठका हीच नजीकच्या भविष्यातील व्यावसायिक कामकाजाची पसंतीची, प्राधान्याची पद्धत राहणार हे जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थितीत देशभरातील संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारच्या ताणांना सामोरे जावे लागत आहे.

आपल्या कार्यशक्तीच्या निरामय आरोग्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत जागरूक असायला हवे.गोदरेज इंटेरिओ आपल्या वर्कस्पेस आणि एर्गोनॉमिक्स संशोधन विभागातर्फे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या प्रश्नांचा अभ्यास करून आपल्या श्वेतपत्रिकेद्वारे उपाययोजना सुचवत आहे. संशोधन अभ्यासानुसार, ही बाब उघड झाली आहे की गेल्या वर्षीपासून साधारण 46 % कर्मचारी घरून काम करत आहेत.

महामारीला सुरुवात झाल्यानंतर आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये लॅपटॉप आणि मोबाईल फोन यांची भूमिका खूपच महत्वाची राहिली आहे. त्यामुळे स्क्रीन समोरच्या वेळेत खूप वाढ झाली आहे. या अभ्यासातून हे उघड झाले आहे की भारतातील काम करणाऱ्यांपैकी जवळपास 72% लोक कामाची डेडलाईन गाठण्यासाठी दिवसाला 9 हून अधिक तास संगणक वा लॅपटॉप समोर घालवतात. जोडीला, 35% प्रतिसादकांनी हे कबूल केले की नेहमीच्या कामाच्या दिवशी ते एकापाठोपाठ एक अशा 20 हून अधिक व्हर्च्युअल कॉलवर उपस्थित असतात.

त्याहीपुढे जाऊन 41% कर्मचाऱ्यांनी प्रदीर्घ व्हर्च्युअल कॉलनंतर मध्यम ते अति प्रमाणात डोळ्यांची आग होत असल्याचे सांगितले. व्हिडीओ कॉल लांबल्यानंतर अंधुक दिसत असल्याचा अनुभव 19% प्रतिसादकांनी सांगितला. संशोधनातून हेही उघड झाले की 86% कर्मचाऱ्यांना पाठीच्या मणक्यांचा त्रास जाणवत असून महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा जास्त त्रास होत असल्याचे या संशोधनातून उघड झाले आहे. 26 ते 40 वयोगटातील कर्मचाऱ्यांनी वेदनेच्या तक्रारी जास्त केल्या आहेत.

डिजिटल काम करताना आरोग्य सांभाळण्यासाठी काही गोष्टी सुचविण्यात आल्या आहेत

1 डोळे आणि मानेच्या स्नायूंवर पडणारा ताण कमी करण्यासाठी स्क्रीनची जागा वापरणाऱ्याच्या उंचीनुसार त्याच्या डोळ्यांच्या पातळीत किंवा किंचित खाली असावी.

2 डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी स्क्रीनची प्रखरता कमी-जास्त करावी.

3 फोन किंवा कोणत्याही अॅपवर ठराविक वेळानंतर स्क्रीन पासून दुसरीकडे बघण्याची आठवण करून देणारा गजर लावावा.

4 व्हिडीओ पेक्षा ऑडीओ मोड वर कॉल घेणे जास्त फायदेशीर ठरू शकते. विशेषकरून वाढणाऱ्या बैठकांसाठी. त्यामुळे सहभागी कर्मचाऱ्यांना आपल्या बसण्याच्या पद्धतीत बदल करता येऊ शकतो, आजूबाजूला चालता येऊ शकतं, जोडीला बाकीची कामे करता येऊ शकतात आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडेही लक्ष देता येऊ शकतं.

5डोळ्यांची सारखी उघडझाप करा आणि थकवा घालविण्यासाठी डोळ्यांचे व्यायाम नियमितपणे करा.

संबंधित बातम्या : 

Vitamin D Deficiency : तुमच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता आहे हे कसे ओळखाल? जाणून घ्या कशी घ्यायची काळजी

Health Care : मधुमेहींसाठी वजन कमी करणे अवघड, वाचा सविस्तर! 

Home Remedies : ताप आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

(Indians do more than 9 hours of work, 50 percent of people suffer from earache, see what the study says)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....