बदलत्या हवामानामुळे नाक आणि घशात वाढतंय इन्फेक्शन, असा करा घरगुती उपाय

nose and throt infection : हिवाळा सुरु झाला की, अनेक लोकांना श्वास घेताना त्रास होतो. सर्दीमुळे घशात इन्फेक्शन होते. त्यामुळे अशा समस्यांवर तुम्ही घरगुती उपाय देखील करु शकता. यामुळे तुम्हाला समस्यांपासून दिलासा मिळू शकतो.

बदलत्या हवामानामुळे नाक आणि घशात वाढतंय इन्फेक्शन, असा करा घरगुती उपाय
Cold
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 3:20 PM

मुंबई : बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या समस्या ही वाढू लागतात. हिवाळा सुरु होत असताना अनेकांना खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास, ताप अशा समस्या भेडसावत आहेत. दिल्ली असो की मुंबई सगळीकडे प्रदूषणामुळे या समस्या वाढत आहेत. हिवाळ्यात प्रदुषणामुळे लोकांना श्वास घेताना अडचणी येतात. नाक आणि घशाच्या समस्या जाणवतात. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे

तज्ज्ञ सांगतात की, हवामान आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या या समस्या टाळण्यासाठी सर्वप्रथम आपले नाक आणि घसा व्यवस्थित स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक असते. घशाच्या संसर्गामुळे अनेक वेळा घसा सुजतो आणि वेदना होतात. अशा परिस्थितीत कोमट पाण्यात हलके मीठ टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा गार्गल करावे. त्यामुळे सूज येण्यापासून आराम मिळेल आणि बॅक्टेरियाही मरतील.

वाफ घेतल्याने तुमचे तोंड, नाक, घसा आणि फुफ्फुसे स्वच्छ होतात. वाफ घेताना पाण्यात निलगिरीचे तेल किंवा कार्व्हॉल प्लस कॅप्सूल टाकावे. टॉवेलने डोके झाकून घ्या, नंतर वाफ घ्या. यामुळे अनुनासिक मार्गातील अडथळे दूर होतात, फुफ्फुसात जमा झालेला कफ आणि घाण सहज बाहेर पडते आणि सर्व समस्यांपासून आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी वाफ घेणे खूप फायदेशीर आहे.

हळदीचे दूध

रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्या. पण या दुधातली मलई काढून टाका. दूध कोमट असावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या दुधात दोन चिमूटभर सुंठही टाकू शकता. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. सर्दी, खोकल्यासारख्या समस्यांमध्ये हे खूप फायदेशीर मानले जाते.

तुळस

तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हा डेकोक्शन बनवताना तुम्ही तुळस सोबत थोडी हळद, ज्येष्ठमध, गिलॉय देठ, चिमूटभर खडे मीठ आणि काळी मिरी इ.ही टाकू शकता. यामुळे खूप फायदा होईल.

थंड पदार्थ, तेलकट पदार्थ आणि बाहेर विकल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी खाणे टाळा. लिंबू चहा प्या किंवा इतर मार्गाने तुमच्या आहारात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवा. आपल्या आहारात शक्य तितक्या द्रव पदार्थांचा समावेश करा. अशा स्थितीत रात्री जाड कपडे घाला.

(सूचना : वरील उपाय हे सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आलेले आहे. कोणत्याही निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.