International Yoga Day 2022 | त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी ही योगासने नक्की करा!
सर्वांगासन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याला शोल्डर स्टँड असेही म्हणतात. त्वचा चमकदार बनवण्यासाठी हे खूप प्रभावी आसन आहे. हे रक्ताभिसरण सुधारते. हे आसन मुरुम, सुरकुत्या आणि निर्जीव त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करते. यामुळे जर तुम्हाला सुंदर त्वचा हवी असेल तर दररोज सकाळी हे व्यायाम नक्की करा.
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2022) दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे. आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी योगा मदत करतो. जर आपल्याला आयुष्यभर निरोगी राहिचे असेल तर योगा करायला हवाच. योगामुळे फक्त शरीरच नाही तर केस, त्वचा (Skin) देखील चांगली राहण्यास मदत होते. योगा करण्याचा कोणताही फिक्स वेळ नाहीये आपण कधीही योगा करू शकतो. मात्र, सकाळी योगा करणे अधिक फायदेशीर ठरते. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी आपण अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतो. याशिवाय, त्वचेला नैसर्गिकरित्या निरोगी (Naturally healthy) ठेवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे योगासने देखील करू शकतो. चला जाणून घेऊया निरोगी त्वचेसाठी आपण कोणते योगासन करू शकतो.
सर्वांगासन
सर्वांगासन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याला शोल्डर स्टँड असेही म्हणतात. त्वचा चमकदार बनवण्यासाठी हे खूप प्रभावी आसन आहे. हे रक्ताभिसरण सुधारते. हे आसन मुरुम, सुरकुत्या आणि निर्जीव त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करते. यामुळे जर तुम्हाला सुंदर त्वचा हवी असेल तर दररोज सकाळी हे व्यायाम नक्की करा. तसेच या आसनामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास देखील मदत होते.
हलासन
हलासन केल्याने आपले शरीर निरोगी राहते, शिवाय तुमची त्वचा चमकदार बनविण्यात मदत करते. या आसनामुळे पचनसंस्थाही निरोगी राहते. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी हे सर्वोत्तम आसन आहे. हलासनाच्या नियमित सरावाने मनाला शांती मिळते. यामुळे मणक्याची लवचिकता वाढते आणि पाठदुखीमध्ये आराम मिळतो. हलासनाचा सराव तणाव आणि थकवा हाताळण्यास देखील मदत करतो. हलासनामुळे मेटाबॉलिज्म वाढते. हलासन केल्याने मनक्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.
ताडासन
ताडासन करणे शरीरासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. या आसनामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास मदत होते. ताडासन केल्याने आपली फुफ्फुसे निरोगी राहतात. दररोज हे आसन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. ताडासन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. हे आसन करण्याच्या अगोदर नेहमीच एक लांब श्वास घ्या आणि मगच करा. या आसनामुळे उंची वाढण्यासही मदत होते.