International Yoga Day 2022: नियमित योगासने केल्यास 15 आजारांचा धोका कमी होतो, वाचा अत्यंत महत्वाचे!

रक्तदाब आणि लठ्ठपणा हे दोन्ही कमी करण्यासाठी योगा मदत करतो. योगाचा रक्तदाबावरील जोखीम कमी परिणाम शोधण्यासाठी एक अभ्यास केला गेला. संशोधकांनी उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दोन गटात विभागले. एका गटाला 12 आठवडे त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत योगासनांचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला होता तर दुसऱ्या गटाच्या आहारात बदल करण्यात आला होता.

International Yoga Day 2022: नियमित योगासने केल्यास 15 आजारांचा धोका कमी होतो, वाचा अत्यंत महत्वाचे!
Image Credit source: wallpaperflare.com
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 9:39 AM

मुंबई : योगा करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर (Beneficial) आहे. योग हा केवळ मानसिक आरोग्यासाठीच फायदेशीर नसून अनेक प्रकारच्या शारीरिक आरोग्याच्या समस्यांवरही योगा फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, योगासन (Yoga) आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवून, आपण किमान 15 रोगांचा धोका कमी करू शकता. योगामुळे तुमचा मूड चांगला होण्यास मदत होते. नैराश्य, चिंता, हृदय, फुफ्फुस आणि रक्तदाब (Blood pressure) यासह अनेक शारीरिक समस्या दूर करण्यास योगासने मदत करतात. इतकेच काय तर वजन कमी करण्यासही योगा केल्याने मदत होते. दररोज किमान दिड तास योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

रक्तदाब आणि लठ्ठपणा

रक्तदाब आणि लठ्ठपणा हे दोन्ही कमी करण्यासाठी योगा मदत करतो. योगाचा रक्तदाबावरील जोखीम कमी परिणाम शोधण्यासाठी एक अभ्यास केला गेला. संशोधकांनी उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दोन गटात विभागले. एका गटाला 12 आठवडे त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत योगासनांचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला होता. तर दुसऱ्या गटाच्या आहारात बदल करण्यात आला होता. संशोधकांनी निष्कर्ष काढला की योग गटातील लोकांमध्ये सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब लक्षणीयरीत्या सुधारला आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, रक्तदाब नियंत्रणात ठेवून तुम्ही अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करू शकता.

हे सुद्धा वाचा

योगासनांचा सराव

रोगांचा धोका कमी करण्यासोबतच योगासनांचा सराव करण्याची सवय लावल्याने तुमची जीवनशैली निरोगी राहण्यास देखील मदत होते. आयुष्य वाढवण्यातही त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. संशोधनात असे दिसून आले आहे की योगाभ्यास केल्याने तुम्हाला रोगमुक्त राहून दीर्घायुष्य मिळू शकते. आनंदी जीवनासाठी, सर्व लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात योगासनांचा समावेश केला पाहिजे. तसेच योगा केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढण्यास मदत होते. यामुळेच आपण दररोज योगा हा करायलाच हवा. योगा केल्याने आपले केस आणि त्वचाही निरोगी राहते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.