पाणी बदलल्याने केस गळतात का? तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या
तुमचे केस गळत आहेत का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. केस गळण्याची समस्या आजकाल प्रत्येकासाठी एक सामान्य परंतु त्रासदायक समस्या बनली आहे. अनेकदा आपल्याला या समस्येमागची कारणे समजत नाहीत आणि त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींना दोष देण्यास सुरुवात करतो. एक प्रश्न अनेकदा पडतो की, पाणी बदलल्याने केसगळती होऊ शकते का? याविषयी जाणून घेऊया.
तुमचे केस गळत असल्यास ही बातमी नक्की वाचा. कारण, ही बातमी तुमच्या फायद्याची असू शकते. पाणी बदलल्याने केसगळती होऊ शकते का? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर याचंच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. जाणून घेऊया.
आजच्या काळात केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. तरुण असो वा वृद्ध, सर्व वयोगटातील लोक या समस्येशी झगडत आहेत. या समस्येमुळे केवळ आत्मविश्वासावरच परिणाम होत नाही तर मानसिक ताणही येऊ शकतो. केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे लोकांचा असाही विश्वास आहे की जेव्हा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घर बदलतात तेव्हा ते तेथे वापरत असलेल्या आंघोळीच्या पाण्यामुळे केस गळतात, परंतु खरंच असे आहे का? जाणून घेऊया.
तुम्ही नवीन शहरात गेला असाल आणि केस गळण्याची समस्या सुरू झाली असेल तर ते पाण्यातील बदलामुळे असू शकते. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.
बदलत्या पाण्यामुळे केस गळतात का?
श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विजय सिंघल सांगतात की, केस गळण्याचे कारण पाण्यातील बदल नसून पाण्याच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे असू शकते. खराब दर्जाचे पाणी केस गळणे किंवा कमकुवत होण्याचे प्रमुख कारण असू शकते. पाण्यात क्लोरीन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे कडक धातू किंवा घाण जास्त असल्यास ते केस आणि टाळूचे नुकसान करू शकते. अशा पाण्याने केस धुतल्यास टाळूतील ओलावा दूर होऊन केस कोरडे होऊ शकतात. यामुळे केस कमकुवत होऊन तुटतात. तसेच, हे केसांचे नैसर्गिक तेल देखील काढून टाकू शकते. चला तर मग जाणून घेऊया, त्यापासून बचाव कसा करायचा…
तुम्ही काय केलं पाहिजे?
पाणी शुद्ध करण्यासाठी फिल्टर किंवा सॉफ्टर वापरा. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारेल आणि केसांना नुकसान होणार नाही.
केसांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरसह शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा. यामुळे केस कोरडे होण्यापासून वाचतील.
आठवड्यातून एकदा नारळ, आवळा किंवा बदामाच्या तेलाने टाळूला मसाज करा. असे केल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि टाळूचा ओलावा राहतो.
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी, आपल्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज युक्त पदार्थांचा समावेश करा.
समस्या वाढत असेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)