कालबाह्य झालेली औषधे घेणे कधीही सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
औषधे कालबाह्य झाल्यानंतर वापरल्यास फायदा होण्या ऐवजी त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे कालबाह्य झालेले औषधे वापरने टाळलं पाहिजे.
आरोग्याच्या समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे औषधी घेण्याचे प्रमाण देखील वाढले. प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते. त्याचप्रमाणे गोळ्या औषधांना देखील एक्सपायरी डेट असते. ज्याप्रमाणे घरात पडलेल्या जुन्या वस्तू निरुपयोगी झाल्यानंतर त्या फेकून दिल्या जातात. त्याचप्रमाणे औषधांच्या बाबतीतही तसं केलं पाहिजे कारण जर औषधे कालबाह्य झाली. तर त्यानंतर वापरल्यास फायदा होण्याऐवजी त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे कालबाह्य झालेले औषधे वापरने टाळलं पाहिजे. काही वेळा औषधांची मुदत संपली आहे की नाही हे सहजासहजी कळत नाही.अमेरिकेच्या एफडीएने यासंबंधीची माहिती लोकांना शेअर केली आहे.
अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने प्रिस्क्रीप्शन आणि ओव्हर द काउंटर औषधांवर कालबाह्य तारखा सादर केल्या आहे. त्यानंतर प्रत्येक औषधावर त्याची एक्सपायरी डेट लिहिली जाते या तारखेपासून हे निश्चित होते की आतापर्यंत हे औषध वापरणे सुरक्षित आहे. त्यानंतर औषध वापरू नये त्यामुळे प्रत्येक औषध उत्पादक कंपनीला औषधावर लिहिण्यास बंधनकारक करण्यात आले.
औषधाची एक्सपायरी डेट कशी जाणून घ्यावी
दिल्लीच्या जीटीपी हॉस्पिटल मधील मेडिसिन विभागातील डॉक्टर अजित कुमार म्हणतात की, प्रत्येक औषधावर त्याची एक्सपायरी डेट लिहिलेली असते. त्यावर लिहिलेले असते की कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिन्यात हे औषध संपणार आहे. डॉक्टर पुढे स्पष्ट करतात की कालबाह्य औषधे वापरणे धोकादायक आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. कारण या औषधांमध्ये अनेक प्रकारची रसायने, क्षार आणि घटक वापरले जातात. त्यांच्या वापराची तारीख असते त्यानंतर ही रसायने किंवा क्षार कोणताही फायदा देण्याऐवजी ते नुकसानकारक ठरतात.
कालबाह्य तारखेनंतर या औषधांच्या रासायनिक रचनेत बदल होऊ शकतो. ज्यामुळे या औषधांचा वापर कमी प्रभावी आणि धोकादायक होऊ शकतो. याशिवाय काही औषधे कालबाह्य झाल्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे या औषधांचा आजारांवर कोणताही परिणाम होत नाही.
होऊ शकतात आजार
कालबाह्य झालेल्या औषधांचा वापर करून अनेक गंभीर आजार आणि प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता निर्माण होण्याचा धोका असल्याचा डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकदा एक्सपायरी डेट निघून गेली की औषध वापरण्यासाठी सुरक्षित आहे की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे त्यावर लिहिलेली एक्सपायरी डेट वाचूनच औषधांचा वापर करावा. नंतर वापरल्यास औषधांचा कोणत्याही अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये गंभीर मूत्रपिंड किंवा यकृत रोग होऊ शकतात.