रात्री ब्रा घालून झोपणं योग्य की अयोग्य? तुम्हालाही नेमकं हेच कन्फ्युजन? आज जाणून घ्या उत्तर
रात्री ब्रा घालून झोपणे किंवा काढणे योग्य आहे का, असा अनेक महिलांचा अनेकदा संभ्रम असतो. जर तुम्हीही या प्रश्नावर संभ्रमात असाल तर आज आम्ही तुम्हाला याचे उत्तर देत आहोत.
मुंबई: आपल्या देशातील स्त्रिया अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत, पण एक असे क्षेत्र आहे ज्यात त्या अजूनही संभ्रमात असतात. किंबहुना, त्यांच्या अंतर्वस्त्रांची निवड आणि त्यांचा वापर करण्याच्या पद्धतींबद्दल त्या बरेचदा गोंधळलेल्या असतात. रात्री ब्रा घालून झोपणे किंवा काढणे योग्य आहे का, असा अनेक महिलांचा अनेकदा संभ्रम असतो. जर तुम्हीही या प्रश्नावर संभ्रमात असाल तर आज आम्ही तुम्हाला याचे उत्तर देत आहोत.
रात्री ब्रा घालून झोपावे का?
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर स्त्रिया रात्री ब्रा काढून झोपल्या किंवा घातल्या तर दोन्ही बाबतीत शरीराचे कोणतेही नुकसान होत नाही. आतापर्यंत असे कोणतेही संशोधन नाही की ब्रा घालून झोपलं काय किंवा ब्रा काढून झोपलं काय स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो किंवा वाढतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ब्रा घालून झोपू शकता किंवा ब्रा काढून झोपू शकता. मात्र हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर तुम्ही रात्री ब्रा घालून झोपत असाल तर त्याचा आकार योग्य असावा अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो.
ब्रा खरेदी करताना घ्या ‘ही’ खबरदारी
आरोग्य तज्ञांच्या मते, जर तुमची ब्रा स्तनावर योग्य बसत नसेल तर तुम्हाला वेदना होऊ शकते आणि अस्वस्थतेला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ब्रा खरेदी करताना त्याचे फॅब्रिक, आकार आणि आपल्या शरीराचा पोत याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. योग्य ब्रा खरेदी केल्याने तुमचे व्यक्तिमत्त्व तर सुधारू शकतेच, शिवाय तुम्हालाही कॉन्फिडन्स येतो.
‘या’ परिस्थितीत ब्रा घालू नका
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर तुमच्या स्तनाला सूज आली असेल किंवा निप्पलमध्ये पू असेल तर काही दिवस ब्रा घालू नये असे केल्याने संसर्ग वाढू शकतो. जेव्हा तुमची समस्या बरी होईल तेव्हा तुम्ही पुन्हा ब्रा घालू शकता. त्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही.