Acidity : ॲसिडिटी झाल्यास दूध पिणं योग्यं की अयोग्य ? जाणून घ्या सर्वकाही

अनेक वर्षांपासून ॲसिडिटीच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक दुधाचे सेवन करतात. मात्र असे करणे योग्य की अयोग्य, त्याने काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.

Acidity : ॲसिडिटी झाल्यास दूध पिणं योग्यं की अयोग्य ? जाणून घ्या सर्वकाही
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 2:17 PM

नवी दिल्ली : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे ॲसिडिटी (Acidity) ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. निष्काळजीपणामुळे अनेक लोकांसाठी ॲसिडिटी ही गंभीर समस्या बनते. यासाठी लोक विविध प्रकारचे उपाय (many remedies) करतात. त्याच वेळी, काही लोक ॲसिडिटीच्या समस्येवर मात करण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला देतात. मात्र, ॲसिडिटीने त्रस्त लोकांच्या मनात दूध (drinking milk)पिण्याआधी हा प्रश्न कायम असतो, की दूध पिणे योग्य आहे की नाही? याबाबत योग्य माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

ज्या लोकांना ॲसिडिटीची समस्या असते त्यांना अन्ननलिकेत वेदना होणे तसेच जेवल्यानंतर पोटात जळजळ होणे आणि आंबट ढेकर येणे अशी लक्षणे जाणवतात. तर काही वेळा त्यांना बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास देखील होतो. जीवनशैलीत बदल करणे व खाण्यापिण्याच्या सवयी सुधारणे या उपायांनी ॲसिडिटीवर उपचार करता येऊ शकतात. काही घरगुती उपायांनीही ॲसिडिटीचा त्रास कमी करता येऊ शकतो.

काय आहेत ॲसिडिटीची लक्षणे ?

– पोटात जळजळ होणे

हे सुद्धा वाचा

– घशात जळजळणे

– अस्वस्थ वाटणे

– आंबट ढेकर येत राहणे

– तोंडाची चव जाणे

– बद्धोष्ठतेचा त्रास होणे.

कशामुळे होतो ॲसिडिटी ?

1) सतत मांसाहार व तेलकट, तिखट पदार्थ खाणे

2) धूम्रपान व मद्यपान करणे

3) ताणतणाव

4) पोटाचे आजार

ॲसिडिटी साठी दूध योग्य की अयोग्य ?

अनेक वर्षांपासून ॲसिडिटीच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक दुधाचे सेवन करतात. दुधामध्ये एल्कलाइन आढळते, जे पोटातील जास्तीचे ॲसिड सोडते किंवा निष्प्रभ करते. यासोबतच ॲसिडिटीची समस्याही दूर होते. तसेच दुधात कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे आपली हाडेही मजबूत होतात.

यासंदर्भात तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दूधामुळे ॲसिडिटीमध्ये तात्पुरता आराम मिळतो. मात्र दुधाचे सेवन हे काही कायमस्वरूपी उपयोगी ठरत नाही. त्यात फॅट आणि प्रथिने आढळतात. यामुळे पोटात ॲसिडचे उत्सर्जन होते, ज्यामुळे पचनासंबंधीत इतर समस्यांना प्रोत्साहन मिळून आणखी त्रास होऊ शकतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ॲसिडिटी असताना दुधाचे सेवन केल्याने छाती आणि घशात जळजळ होते.

ॲसिडिटीपासून कशी मिळवावी मुक्ती ?

तुम्हाला जर वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असेल आणि त्यावर मात करायची असेल तर त्यासाठी केवळ दुधावर अवलंबून न राहता इतर गोष्टींचे सेवन करणे चांगले असते. जर तुम्हाला दीर्घकाळ ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर तुमचा आहार आणि जीवनशैली सुधारणे हे अतिशय महत्वाचे ठरते. एकाच वेळी भरपूर जेवण्याऐवजी, नियमित अंतराने थोडं-थोडं अन्न खा. तसेच पुरेसे पाणी प्या. यामुळे ॲसिडिटीच्या समस्येपासून लवकर आराम मिळतो.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.