इंटरकोर्सनंतर लघवीला का जावं? इन्फेक्शन टाळण्यासाठी जाणून घ्या महत्वाची माहिती!
जोडीदारासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) बनवताना अनेक गोष्टींची काळजी (Care) घेणे खूप महत्वाचे आहे. जर त्यावेळी तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला अनेक समस्यांना (Problems) सामोरे जावे लागेल. शारीरिक संबंध ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
मुंबई : जोडीदारासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) बनवताना अनेक गोष्टींची काळजी (Care) घेणे खूप महत्वाचे आहे. जर त्यावेळी तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला अनेक समस्यांना (Problems) सामोरे जावे लागेल. शारीरिक संबंध ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण त्यानंतर केलेल्या काही चुका तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरतात. विशेष: आज आपण संभोगानंतर लगेच लघवी का करावी आणि संभोगानंतर खरोखरच लघवी करणे फायदेशीर आहे का? हे जाणून घेणार आहोत.
संभोगानंतर लघवी करण्याची कारणे
संभोगानंतर महिलांनी लगेचच लघवी करणे खूप गरजेचे आहे. संभोग करताना पुरुषांच्या लघवीमध्ये असलेले बॅक्टेरिया महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सहज प्रवेश करतात. यामुळे बॅक्टीरिया वाढण्याची शक्यता निर्माण होते आणि याच कारणामुळे महिलांनी संभोगानंतर लगेचच लघवी करावी.
युरिन इन्फेक्शन होऊ शकते!
अनेक महिलांना संभोगानंतर युरिन इन्फेक्शनच्या समस्येला सामोरे जावे लागते. कारण संभोग करताना बॅक्टेरिया त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्रवेश करतात आणि यामुळे बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे ही समस्या निर्माण होते. याचे कारण म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांना यूटीआयचा धोका जास्त असतो.
संभोगानंतर किती वेळाने लघवी करावी
संभोगानंतर 30 मिनिटांच्या आत लघवी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जितका जास्त टाईमपास कराल. तितकीच बॅक्टेरियाची संख्या वाढण्यास सुरूवात होते. यामुळे शक्यतो संभोगानंतर लगेचच लघवीला जाण्याचा प्रयत्न करा.
पुरूषांना धोका अत्यंत कमी
संभोगानंतर पुरूषांना लघवी करण्याची काही विशेष गरज नाहीये. त्यांना बॅक्टेरियाचा धोका खूप कमी प्रमाणात असतो. यामुळे पुरूषांपेक्षा महिलांना याबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
संभोगानंतर लघवी करताना जळजळ होणे
बऱ्याच महिलांना संभोगानंतर लघवी करताना जळजळ होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. बऱ्याच वेळा यामुळे महिलांना लघवी देखील करता येत नाही. ज्यावेळी या प्रकारची समस्या निर्माण होते. त्यावेळी बॅक्टेरियाने आपल्या योनीमध्ये प्रवेश केलेला असतो. अशावेळी व्यवस्थित स्वच्छता करा आणि त्रास कमी होत नसेल तर डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.
महिलांचा खूप मोठा गोडगैर समज
बऱ्याच महिलांना वाटते की, संभोगानंतर लगेचच लघवी केल्याने गर्भधारणा होत नाही. यामुळे महिला संभोगानंतर लघवी करणे 99 टक्के टाळतात. मात्र, हा फक्त गैरसमज आहे. कारण गर्भधारणेसाठी शुक्राणूंना योनीतून फॅलोपियन ट्यूबपर्यंत प्रवास करणे आवश्यक असते. यामुळेच गर्भधारणेचा आणि लघवी करण्याचा काहीही संबंध नाहीये. आजतकने यासंदर्भात रिपोर्ट दिला आहे.
संबंधित बातम्या :
रात्री झोपताना घाम येतो? वेळीच सावध व्हा, असू शकतो गंभीर आजारांचा धोका
पिवळ्या दातांमुळे त्रस्त आहात? या घरगुती उपायांनी दातांवरील चमक वाढवा