Health | हिवाळ्या निरोगी हृदयासाठी आताच करा या महत्त्वाच्या चाचण्या, जाणून घ्या

हिवाळ्यात जसजसा गारठा वाढत जातो, तसतसे हृदयाची काळजी घेण्याचे महत्त्व वाढत जाते. थंडी वाढायला लागली की रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासंबधित आव्हाने निर्माण होऊ लागतात, म्हणून हृदय सदृढ रहावे यासाठी योग्य ती काळजी घेणे आणि त्यासाठी आवश्यक चाचण्या करून घेणे महत्वाचं आहे.

Health | हिवाळ्या निरोगी हृदयासाठी आताच करा या महत्त्वाच्या चाचण्या, जाणून घ्या
winter
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 3:10 PM

मुंबई : हिवाळा सुरू होण्याआधी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी चाचण्या करून घेण्याचा विचार करा. यामध्ये रक्तदाब, कोलेस्ट्रॉल पातळीची तपासणी ज्यांचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यासंबंधी चाचण्यांचा समावेश असतो. कोणते धोके आहेत हे लक्षात घेतल्याने तुमच्या हृदयाचे संभाव्य धोके कमी करण्यासाठी उपाययोजना ठरवता येतात. याबाबत न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

थंड हवामानाचा रक्तदाबावर परिणाम होऊन त्यात चढ-उतार आणि हृदयावरील ताण वाढू शकतो. घरी आणि डॉक्टरांच्या भेटी दरम्यान नियमित रक्तदाब तपासणी केल्याने तुमच्या हृदयावर पडणाऱ्या ताणाची कल्पना येते आणि उच्च रक्तदाब – हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसाठी एक प्रमुख जोखीम घटक, व्यवस्थापित करण्यात मदत होते.

हिवाळ्यात आहार विहारात बदल होतात आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल पातळीवर परिणाम होऊ शकतो. उच्च कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराचे महत्त्वपूर्ण कारण आहे. कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी केल्याने आजारांचे वेळीच निदान होऊन योग्य उपाययोजना करणे, आणि निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल किंवा औषधोपचार करणे शक्य होते.

मधुमेह आणि हृदयरोग सहसा एकत्र उद्भवतात. हिवाळ्यात असणारे सणवार आणि मेजवान्या मधुमेहाचा धोका वाढवतात आणि असल्यास त्रास वाढवतात. मधुमेह संबंधित तपासण्या नियमितपणे केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होऊन मधुमेहाशी संबंधित हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.

ईसीजीमध्ये हृदयाची इलेक्ट्रिकल अॅक्टीव्हिटी मोजली जाते आणि काही समस्या असल्यास लक्षात येऊ शकतात. हिवाळ्याचा ताण आणि हवेतील गारव्यामुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. वेळोवेळी केलेल्या ईसीजी चाचणीमुळे तुमच्या हृदयाची लय आणि इलेक्ट्रिकल स्थिरतेबद्दल माहिती मिळते.

पारंपारिक चाचणी नसली तरी, फ्लूची लस घेणे हा एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. इन्फ्लूएंझामुळे हृदयावर ताण येऊ शकतो, विशेषत: हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार असलेल्यांसाठी. हिवाळ्यात फ्लूपासून स्वतःचे रक्षण करणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.

योग्य वजन हा हृदयाच्या आरोग्यातील महत्वाचा घटक आहे. हिवाळ्यात बसून रहावेसे वाटते आणि आहार देखील वाढतो ज्यामुळे वजन वाढू शकते. वजन आणि बीएमआयवर नियमित लक्ष ठेवल्याने आहारात आणि व्यायामात वेळीच बदल करणे शक्य होते. थोडक्यात, सजग आणि सक्रिय उपाय केल्यास हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याशी तडजोड करण्याची गरज नाही.

या अत्यावश्यक चाचण्यां करून घेतल्यास हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याचे निरीक्षण करण्यात आणि व्यवस्थापित करण्यात मदत होते. ज्यामुळे हंगामी आव्हानांची योग्य काळजी घेतली जाते. वेळीच चाचण्या करून घेतल्याने तुमच्या हृदयाला तुम्ही थंडीला सामोरे जाण्यासाठी तयार केले असल्याची खात्री होऊन आत्मविश्वासाने हिवाळ्याचा आनंद घेता येईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.