Health | हृदय निरोगी ठेवण्यापासून हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यापर्यंत हा ज्यूस अत्यंत फायदेशीर, आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या!
हृदय निरोगी ठेवण्यासाठी जांभूळ फायदेशीर आहे. ज्यांना हृदयाशी संबंधित काही समस्या असतील तर त्यांनी आपल्या आहारामध्ये जांभळाच्या रसाचा नक्कीच समावेश करावा. जांभूळमध्ये पोटॅशियम भरपूर असते, ते हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि पक्षाघात यांसारख्या आजारांना दूर ठेवण्यास मदत करते. बाराही महिने जांभूळ बाजारामध्ये मिळत नाही.
मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामाला सुरूवात झाली की, बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात जांभूळ येतात. जवळपास सर्वांनाच जांभूळ खायला आवडतात. हे फळ आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. या फळाचा रंग निळा आणि जांभळा असतो. जांभूळमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C), व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी6, रिबोफ्लेविन असते. जांभळाचा रस पिणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्याचे हे काम करते. जांभळाचा रस उन्हाळ्यामध्ये पिल्याने हायड्रेटेड (Hydrated) राहण्यासही मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात जांभळाचा रस पिण्याचे फायदे.
हृदय
हृदय निरोगी ठेवण्यासाठी जांभूळ फायदेशीर आहे. ज्यांना हृदयाशी संबंधित काही समस्या असतील तर त्यांनी आपल्या आहारामध्ये जांभळाच्या रसाचा नक्कीच समावेश करावा. जांभूळमध्ये पोटॅशियम भरपूर असते, ते हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि पक्षाघात यांसारख्या आजारांना दूर ठेवण्यास मदत करते. बाराही महिने जांभूळ बाजारामध्ये मिळत नाही. अशावेळी ज्यांना हृदयाशी संबंधित काही आजार असतील अशांनी जांभळाच्या पानांचा रस पिणेही फायदेशीर ठरते.
हिरड्या आणि दात
हिरड्या आणि दातांची एकदा समस्या निर्माण झाली तर आपल्याला काहीही खाताना त्रास होतो. जांभूळ तुमच्या हिरड्या आणि दातांसाठी फायदेशीर आहे. जांभूळच्या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्यांचा उपयोग हिरड्यांमधून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी पाने सुकवून घ्या, आता ही वाळलेली पाने पावडरच्या स्वरूपात वापरता येतील. हे हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव आणि संसर्ग टाळण्यास मदत करते. तसेच आपली दातदुखी रोखण्यासाठी जांभळाच्या पानांची पेस्ट करून दातांना लावा.
हिमोग्लोबिन
शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यावर आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. जांभूळ हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. जांभूळमध्ये खनिजे, व्हिटॅमिन सी आणि लोह असते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते. याने रक्त शुद्ध होते. लोहाची कमतरता किंवा अॅनिमिया असलेल्या लोकांसाठी जांभूळ खूप फायदेशीर आहे. यामुळे ज्यांना हिमोग्लोबिनची समस्या आहे, अशांनी दररोज जांभळाचे नक्कीच जेवण करावे.