Dengue : वाढत्या तापासह उलटी येणे ठरू शकते धोकादायक, डेंग्यूची ही खतरनाक लक्षणे माहीत आहेत का ?
देशातील अनेक राज्यात डेंग्यूची प्रकरणं वाढत आहेत. त्यामुळे काहींना जीवही गमवावा लागला आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, डेंग्यूची काही लक्षण जीवघेणी असू शकतात.

Dengue Cases : देशभरात पुन्हा एकदा डेंग्यूचा (Dengue) वेगाने प्रसार होत असून डेंग्यूचे रुग्ण (patients) वाढू लागले आहेत. चिंतेची गोष्ट म्हणजे यामुळे जीम गमवाव्या लागणाऱ्याना लोकांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. गाझियाबादपासून पश्चिम बंगालपर्यंत डेंग्यूने थैमान घातले आहे. बंगालमध्ये या आजारामुळे अनेक मृत्यू झाले आहेत, तर गाझियाबादमध्येही एका तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत या आजाराचा धोका सातत्याने वाढत आहे.
डेंग्यूची काही लक्षणे प्राणघातक ठरू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशी लक्षणे दिसताच तातडीने रुग्णालयात जावे, दुर्लक्ष केल्यास ते जीवावर बेतू शकते.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आता दिवसेंदिवस डेंग्यूच्या केसेस वाढू लागतील. अशा परिस्थितीत त्याची लक्षणे ओळखून वेळेवर उपचार करणे महत्वाचे आहे. जर कोणालाही ताप आला तर डेंग्यूची टेस्ट करून घ्यावी, त्यामुळे तो ताप डेंग्यमुळे आला आहे की नाही हे समजेल व त्याप्रमाणे उपचार करता येतील.
डेंग्यूची खतरनाक लक्षणे कोणती ?
वरिष्ठ डॉक्टर सांगतात की, डेंग्यूमध्ये आधी हलकासा ताप येतो, तो काही दिवसांत बरा होतो, मात्र उलट्या, जुलाब यासोबतच दिवसेंदिवस ताप वाढत असेल, तर हे शरीरात डेंग्यूचा धोकादायक स्ट्रेन असल्याचे लक्षण आहे. अशा परिस्थितीती संबंधित रुग्णाला डेंग्यू शॉक सिंड्रोम होऊ शकतो, ज्यामुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ लागते. रुग्ण बेशुद्ध पजतो, काही प्रकरणांमध्ये शरीरातील अवयवही निकामी होऊ लागतात, जे जीवावर बेतू शकते. अशा वेळी रुग्णाला ताबतडतोब रुग्णालयात नेऊन उपचार सुरू करावेत अन्यथा ते जीवघेणे ठरू शकते.
ताप आल्यास करावी डेंग्यूची टेस्ट
असे अनेक रुग्ण असतात, जे ताप येऊनही डेंग्यूची टेस्ट करत नाहीत, असे डॉक्टर सांगतात. दुर्लक्ष केल्यामुळे वेळेवर उपचार होत नाहीत आणि रुग्णाला जीव गमवावा लागतो. त्यामुळे ताप आला तर लगेच डेंग्यूची टेस्ट करावी. ती पॉझिटिव्ह आल्यास त्वरित डॉक्टरांता सल्ला घेऊन उपचार करावेत, ज्याने आजार नियंत्रणात येऊ शकतो.
या लक्षणांकडे द्या विशेष लक्ष
– 100 डिग्री पेक्षा जास्त ताप
– उलटी आणि जुलाब (उलटीतून रक्त येणे)
– तीव्र डोकेदुखी
– स्नायूंमध्ये वेदना होणे
असा करा बचाव
– घराजवळ पाणी साचू देऊ नका.
– शरीर हायड्रेटेड ठेवा
– पूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे घालावेत
– झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)