Stairs for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढण्याचा व्यायाम करताय? नक्की जाणून घ्या या गोष्टी

वजन कमी करण्यासाठी खिशाला अनावश्यक ताण न देणारा (कमी खर्चिक) आणि कमी वेळात अधिक लाभ देणारा पर्याय शोधत असाल तर जिने अथवा पायऱ्या चढण्याचा व्यायाम तुमच्यासाठी उत्तम ठरेल.

Stairs for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढण्याचा व्यायाम करताय? नक्की जाणून घ्या या गोष्टी
वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढण्याचा व्यायाम करताय? नक्की जाणून घ्या या गोष्टीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 4:20 PM

नवी दिल्ली: हल्लीच्या तरुण पिढीमध्ये वजन कमी (weight loss) करण्याची एक क्रेझ आहे. त्यामुळे ते जिममध्ये जाणं अधिक सुरक्षित समजतात. विविध प्रकारचे व्यायामही (exercise) करतात. त्यामुळेच अनेक जण सध्या लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्या (using stairs) चढून वर जाणे पसंत करतात. तसं पाहिलं तर पायऱ्या चढण्याचा हा व्यायाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुमचा लठ्ठपणा (obesity) जर वाढत असेल, तर तो कमी करण्यासाठी पायऱ्या या तुमच्यासाठी एक चांगला व्यायाम ठरू शकतात. पायऱ्या चढणे हा एक असा व्यायाम आहे ज्यामुळे आपल्या खिशावर अनावश्यक भार पडत नाही. पायऱ्या चढण्याचे अनेक फायदे (benefits) आहेत, त्यामुळे फिटनेस एक्स्पर्टही हेल्दी व्यक्तीला याचा उपयोग करण्याचा सल्ला देतात. मात्र पायऱ्यांचा व्यायामासाठी वापर करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणेही गरजेचे आहे.

वजन कमी करण्यासाठी पायऱ्यांचा प्रयोग

हेल्दीफाइमी नुसार, तुम्ही जितके जास्त काळ पायऱ्या चढण्याचा व्यायाम कराल तितकी तुमची कॅलरी बर्न होईल. पण जितक्या वेगाने तुम्ही शिडी चढण्यासाठी व्यायाम कराल, तितके तुम्ही जखमी होण्याची शक्यता जास्त असते.

म्हणून पायऱ्या चढण्याचा व्यायाम ५ ते ७ मिनिटे करा. हा व्यायाम तुम्ही आठवड्यातून तीन दिवस हे करू शकता. जेव्हा तुम्हाला या व्यायामाची सवय होईल, तेव्हा हळूहळू तुम्ही वेळ वाढवू शकता. त्यानंतर तुम्ही 7 मिनिटांऐवजी 10 ते 15 मिनिटेही हा व्यायाम करू शकता.

हे सुद्धा वाचा

पायऱ्या चढण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

जिना चढण्याचा व्यायाम करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पायऱ्या जास्त दूर आणि जास्त मोठ्या असू नयेत. त्यांच्यामध्ये जास्त अंतर नसावे अन्यथा तुम्ही पडण्याचा धोका असू शकतो.

पायऱ्या चढताना एकावेळी 2 पायऱ्या चढू शकता, पण उतरताना एका वेळी एकच पायरी उतरावी. तुम्ही दिवसातून बऱ्याच वेळा हा व्यायाम करू शकता, त्याने तुमचे वजन वेगाने कमी होईल आणि पोटही बाहेर येणार नाही.

पायऱ्या चढताना दीर्घ श्वास घ्या

जेव्हा तुम्ही जिना अतवा पायऱ्या चढता तेव्हा तुम्हाला दम लागू शकतो, अशा वेळी दीर्घ श्वास घ्यावा. हाही एक प्रकारचा व्यायाम आहे आणि तुम्ही एका वेळी ४० ते ५० वेळा हे करू शकता. यामुळे तुमच्या पोटाची अतिरिक्त चरबी कमी होईल आणि शरीर चपळ होईल.

ट्रायसेप्स डिप व्यायाम

हाही एक प्रकारचा व्यायाम आहे. तो करताना पहिल्या पायरीवर चढताना संपूर्ण शरीराचा भार आपल्या हातावर येईल अशा पद्धतीने तोल सांभाळावा. हातांवर शरीराचा भार टाकताना हळूहळू वर-खाली करावे आणि दीर्घ श्वास घ्यावा. हा व्यायाम केल्याने पाठ आणि कंबर मजबूत होते, तसेच शरीरावरील अतिरिक्त चरबीही कमी होते.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.