Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका झाडामुळे पसरला कोरोनापेक्षा खतरनाक निपा व्हायरस, केरळात हाहाकार

केरळात चार जणांना निपा या खतरनाक व्हायरसी लागण झाली असून दोघांचा मृत्यू या व्हायरसने झाला असल्याचे म्हटले जात आहे. एका झाडामुळे हा आजार पसरल्याचे म्हटले जात आहे.

एका झाडामुळे पसरला कोरोनापेक्षा खतरनाक निपा व्हायरस, केरळात हाहाकार
nipah virusImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 4:01 PM

कोझिकोड | 13 सप्टेंबर 2023 : केरळात पुन्हा एकदा निपा व्हायरसची दहशत पसरली आहे. केरळच्या ( KERALA ) कोझिकोड जिल्ह्यात निपा विषाणू संसर्गाने दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. निपा व्हायरसचा ( Nipah Virus ) वेरिएंट सर्वात खतरनाक आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की हा व्हायरस मानवाद्वारे मानवात पसरत असतो. याच्या पसरण्याचा वेग जरी कमी असला तरी हा सर्वात खतरनाक आजार आहे. गेल्या ऑगस्टमध्येही एकाचा केरळात या आजाराने मृत्यू झाला होता. हा आजार वघवाघळे आणि डुकरातून माणसात पसरला असल्याचे म्हटले जात आहे.

साल 2018 नंतर ही चौथी वेळ आहे जेव्हा केरळात निपा व्हायरस पसरला आहे. केरळात 2018 मध्ये प्रथम हा आजार पसरला होता. तेव्हा 23 संक्रमित 23 लोकांपैकी 21 जणांचा मृत्यू झाला होता. साल 2019 आणि 2021 मध्ये पुन्हा निपा व्हायरसच्या केस आढळल्या होत्या. हा व्हायरस वटवाघळे किंवा डुकरातून पसरतो. त्यामुळे तीव्र ताप, अंग दुखी, उलट्या अशी लक्षणे आढळतात.

खजूराच्या झाडाद्वारे प्रसार

बांग्लादेशात साल 2016 मध्ये निपा व्हायरसने अनेकांचे बळी घेतले होते. मेडीकल तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस खजूरच्या झाडाला लागलेल्या फळांमधून पसरला आहे. खजूराच्या झाडावर वटवाघळांची वस्ती होती. ज्या लोकांनी या झाडाची फळे खाल्ली त्यांना या आजाराची लागण झाली असावी असे म्हटले जात आहे. बांग्लादेशातील हा निवा व्हेरीएंट केरळातील जनतेला घाबरवित आहे. केरळातील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी तज्ज्ञांची टीम दिल्लीहून रवाना झाली आहे. ही टीम केरळातील परिस्थितीचा अंदाज घेत आहे.

लस किंवा औषधे नसल्याने धोका

निपाचा व्हायरस बद्दल किंवा त्याला रोखण्यासाठी लसींवर कोणतेही संशोधन झालेले नाही. तसेच त्यावर कोणतेही औषध आलेले नाही. हा व्हायरस थेट मेंदू आणि मज्जासंस्थेवरच हल्ला करीत आहे. या आजाराने संक्रमित रुग्ण कोमात जाऊ शकतात. निपा विषाणूचा शोध सर्वप्रथम साल 1999 मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमध्ये लागला होता.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.