Kidney Stones: कोणतेही ऑपरेशन न करता सहज गळून जाईल किडनी स्टोन! या रसांचे करा नेहमी सेवन

शरीरामध्ये जेव्हा किडनी स्टोन हळूहळू तयार होऊ लागतो तेव्हा मूत्राशयातील (Bladder) मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो आणि परिणामी व्यक्तीला लघवी करण्यास जळजळ, आग होणे, प्रचंड प्रमाणात वेदना होणे, अशा अनेक समस्या व लक्षणे जाणवत असतात. जे व्यक्तीच्या शरीरामध्ये किडनी स्टोन तयार होत असतो तेव्हा त्याची लघवी घट्ट होते असते आणि ज्यामुळे मिनरल क्रिस्टल हे एकत्र आल्याने लघवी करताना प्रचंड प्रमाणात वेदना होतात.

Kidney Stones: कोणतेही ऑपरेशन न करता सहज गळून जाईल किडनी स्टोन! या रसांचे करा नेहमी सेवन
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 9:18 PM

मुंबई : किडनी स्टोन (kidney stone) झाल्यावर त्या व्यक्तीस प्रचंड प्रमाणामध्ये वेदना होत असतात. हा एक असा आजार आहे जो आपल्या मूत्राशयाशी निगडित असतो आणि किडनी स्टोन कोणालाही केव्हाही होऊ शकतो. मेडीकल भाषेमध्ये जर सांगायचे झाल्यास नेफ्रोलिथियासिस (Nephrolithiasis) यूरोलिथियासिस किंवा (Urolithiasis) या नावाने किडनी स्टोन ला ओळखले जाते. आपल्या शरीरामध्ये किडनी स्टोन निर्माण होण्याचे वेगळे कारण सुद्धा असतात परंतु जर आपल्या शरीरामध्ये खनिजे आणि क्षार पदार्थ यांची मात्रा वाढल्यास शरीरामध्ये किडनी स्टोन तयार होऊ लागतो. बदललेली आहार पद्धती शरीराचे अधिक वजन वाढणे, काही आजार असतील किंवा आपण सप्लीमेंट प्रोटीन सेवन करत असू तर अशा वेळीसुद्धा किडनी स्टोन होण्याचा धोका वाढत जातो. शरीरामध्ये जेव्हा किडनी स्टोन हळूहळू तयार होऊ लागतो तेव्हा मूत्राशयातील (Bladder) मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो आणि परिणामी व्यक्तीला लघवी करण्यास जळजळ, आग होणे, प्रचंड प्रमाणात वेदना होणे, अशा अनेक समस्या व लक्षणे जाणवत असतात. जे व्यक्तीच्या शरीरामध्ये किडनी स्टोन तयार होत असतो तेव्हा त्याची लघवी घट्ट होते असते आणि ज्यामुळे मिनरल क्रिस्टल हे एकत्र आल्याने लघवी करताना प्रचंड प्रमाणात वेदना होतात.

तसे पाहायला गेले तर ही समस्या खूपच विचित्र आहे, या समस्या मध्ये व्यक्तीला नको नकोसे होते. लघवी करताना वारंवार वेदना होत असतात. जर आपल्याला ही समस्या वेळेवरच कळली तर या समस्येवर आपण लवकर उपचार करू शकतो तसे तर फारसे असे काही मोठे या आजारामुळे घडत नाही परंतु जर आपण जास्त दिवस हा मुतखडा किडनी मध्ये तसाच राहू दिला तर याचा विपरीत परिणाम शरीरावरील अन्य अवयवांवर सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच या वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी डॉक्टर आपल्याला जास्त पाणी पिण्याचा सल्ला देत असतात तसेच वेदना सुरू झाल्यावर डॉक्टरांच्या काही औषधे गोळ्या दिलेल्या आहेत त्या वेळेवर सेवन करण्याचा सुद्धा आपल्याला सल्ला दिला जातो. मुतखडा हा लघवीच्या मार्गामध्ये जमा झाल्यास असल्यास लघवी संदर्भातील अनेक समस्या भविष्यात निर्माण होतात आणि अनेकदा डॉक्टर आपल्याला ऑपरेशन करण्याबद्दल सुद्धा सल्ला देत असतात.

किडनी स्टोनची लक्षणं

बरगड्याच्या खालच्या बाजूस आणि पाठीमध्ये प्रचंड वेदना होणे, पोटात दुखणे,कंबर दुखणे तसेच वेदनेमध्ये चढ-उतार जाणवणे,लघवी करताना त्रास होणे, लघवी करताना आग मारणे ,जळजळ जाणवणे ,गुलाबी, लाल किंवा पांढऱ्या रंगाची लघवी होणे,लघवीतुन दुर्गंधी येणे, वारंवार लघवी लागणे परंतु लघवीला गेल्यावर थांबून थांबून लघवी होणे, मळमळ आणि उलटी इन्फेक्शन झाल्यावर थंडी आणि ताप येणे इत्यादी लक्षणांचा समावेश किडनी स्टोन झाल्यावर होतो. किडनी स्टोन हा मेडिकल औषधांद्वारे दूर करता येतो परंतु जर ही लक्षणे काही सौम्य प्रमाणामध्ये जाणवत असतील तर अशा वेळी आपण घरच्या घरी सुद्धा उपचार करून किडनी स्टोन दूर करू शकतो, चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी कशा पद्धतीने आपण किडनी स्टोन सहजरीत्या कोणत्याही ऑपरेशन शिवाय दूर करू शकतो.

घरच्या घरी कोणतेही औषध न घेता तसेच कोणतेही ऑपरेशन शिवाय आपण जर पुढील काही पदार्थांच्या रसांचे सेवन केले तर किडनी स्टोन मूत्राद्वारे सहजरीत्या गळून पडण्यासाठी मदत होईल.

लिंबुचा रस

आयुर्वेदिक शास्त्रानुसार तसेच केल्या गेलेल्या संशोधनानुसार किडनीतील मुतखडा दूर करण्यासाठी व्यक्तीने नियमितपणे लिंबू पाणी प्यायला हवे. लिंबू मध्ये सायट्रीक ॲसिड असते जे आपल्या शरीरातील कॅल्शियम पासून स्टोन बनवण्यापासून थांबवते. साइट्रेट ऍसिड स्टोनला तोडते आणि म्हणूनच त्यांची हालचाल सुद्धा होते अशावेळी लघवीद्वारे हे स्टोन गळून जाण्याची शक्यता असते. लिंबूच्या रसाचे आपल्या शरीरासाठी अनेक उपयोग आहेत जर आपण लिंबू पाणी नियमितपणे सेवन केले तर आपल्या शरीरातील बॅक्टेरिया दूर करण्याची शक्ती या लिंबाच्या रसामध्ये असते तसेच लिंबाच्या रसामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये असते यामुळेच आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत बनते

तुळशीच्या पानांचा रस

तुळशीचे आयुर्वेदिक शास्त्रात अनेक उपयोग सांगण्यात आलेले आहे तसेच मेडीकल शास्त्रांमध्ये सुद्धा तुळशी उपयुक्त मानली गेलेली आहे. तुळशीच्या पानांमध्ये ऍसिटिक ऍसिड असते, जे किडनीतील मुतखडा विरघळण्यासाठी तसेच वेदना कमी करण्यास मदत करते.तुळशीच्या पानांमध्ये अनेक अशी पोषक तत्व असतात ज्याचा उपयोग आपल्या शरीरातील पचन संस्था उत्तमरीत्या कार्य करण्यासाठी होत असतो तसेच जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची सूज निर्माण झाली असेल तर ती सुद्धा तुळशीच्या पानांच्या रसामुळे दूर होते. तुळशीच्या पानांच्या रसामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि अँटीबॅक्टरियल, अँटी इन्फ्ला मेंट्री गुणधर्म असतात यामुळे आपल्या शरीरातील किडनीचे आरोग्य चांगले राहते.

ओव्याच्या रस

ओवा हा आपल्या प्रत्येकाच्या घरी स्वयंपाक घरामध्ये सहज आढळणारा पदार्थ आहे तसेच ओव्याचे अनेक आयुर्वेदिक शास्त्रात गुणधर्माचे दाखले सुद्धा सांगण्यात आलेले आहे. ओव्याचा रस नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीरात जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होतात तसेच किडनीतील मुतखडा दूर करण्यासाठी सुद्धा ओवा लाभदायक ठरतो. ओव्याचा उपयोग जुन्या काळापासून शरीरातील वेदना दूर करण्यासाठी केला जात आहे. ओवा खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये कोणतेही विषारी घटक जमा झाले असतील तर ते घटक बाहेर पडण्याची शक्ती ओवा मध्ये असते. जर आपण सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यामध्ये ओवा टाकून त्याचे मिश्रण बनवून सेवन केले तर तुमच्या शरीरातील किडनीत जमा झालेला स्टोन हळू हळू गळू लागेल आणि मूत्राच्या मार्गातून तो खडा निघून जाईल.

डाळिंबाचा रस

डाळिंबाच्या रसाचा उपयोग गेल्या अनेक वर्षापासून किडनीचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी लाभदायक ठरले आहे तसेच डाळिंबाचा रस नियमितपणे प्यायल्याने तुमच्या किडनीमध्ये जो स्टोन जमा झाला आहे तो अशा वेळी किडनी तो स्टोन काढण्यासाठी मदत होते तसेच आपल्या शरीरामध्ये कोणतेही विषारी घटक जमा झाले असेल तर ते सुद्धा या रसांमुळे बाहेर पडतात. या डाळींब रसात अँटिऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन होण्याची लक्षणे काही जाणवत असेल तर अशा वेळी या स्टोनचा वाढ होण्यापासून हा रस थांबवतो तसेच आपल्या लघवीच्या ऍसिडिटी लेव्हल ला सुद्धा कमी करतो.

गव्हांकुराचा रस

गव्हांकुराच्या रसामध्ये अनेक असे पोषक तत्व असतात जे अनेक वर्षापासून आपले शरीर व आपले आरोग्य निरोगी राखण्यासाठी मदत करत आहेत तसेच गव्हांकुराचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहेत. केले गेलेल्या अभ्यासानुसार गव्हांकुरामध्ये अनेक गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील मुतखडा विरघळण्यासाठी मदत करतात तसेच आपल्या शरीरातील मूत्रमार्ग सुद्धा स्वच्छ ठेवते. गव्हांकुराचा रस आपण नियमितपणे सेवन केला तर आपल्या किडनीची अंतर्गत स्वच्छता सुद्धा होते आणि म्हणूनच आपल्याला दिवसभरातून एक ग्लास गव्हांकुराचा रस सकाळी उपाशी पोटी सेवन करायला पाहिजे.

टीप : हा लेख फक्त साधारण माहितीसाठी देण्यात आलेला आहे. कोणत्याही प्रकारची औषधे व उपचार तुम्हाला टीवी 9 करण्याचा सल्ला अजिबात येत नाही. जर तुम्हाला कोणती लक्षणे जाणवत असेल तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आणि त्यानंतरच योग्य तो उपचार करा.

इतर बातम्या :

Mumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक

12 आमदारांबाबतचा निकाल आणि नियुक्तीवरुन भाजप प्रवक्ते आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात जुंपली, काय आहेत आरोप-प्रत्यारोप?

Shweta Tiwari Viral Video : ‘तर मी माफी मागते!’, भोवती टिकेचं वादळ घोंगावत असताना श्वेता तिवारीचा माफीनामा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.