गुडघेदुखीपासून मुक्तता हवीय? दिशा पाटनीच्या बहिणीने सांगितले हे व्यायाम

दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनीने गुडघ्याच्या दुखण्यावर मात करण्यासाठी सोपे व्यायाम सांगितले आहेत. बॅकवर्ड रनिंग, खुर्चीसारखे आसन आणि लेग स्ट्रेचिंग हे व्यायाम गुडघ्यातील स्नायू मजबूत करून आणि लवचिकता वाढवून वेदना कमी करण्यास मदत करतात. हे व्यायाम नियमित केल्याने गुडघ्यांची हालचाल सुधारते आणि वेदना कमी होण्यास मदत होते. त्यामुळे गुडघेदुखीच्या समस्या असलेल्यांना हे उपाय उपयुक्त ठरू शकतात.

गुडघेदुखीपासून मुक्तता हवीय? दिशा पाटनीच्या बहिणीने सांगितले हे व्यायाम
Khushboo pataniImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 1:14 PM

बदलत्या जीवन शैलीमुळे तसेच अनियमितपणे आहाराचे सेवन तसेच व्यायामाचा अभाव यामुळे गुडघेदुखीने अनेकजण त्रासलेले आहेत. पूर्वी साठीनंतर होणारे गुडघ्याचे दुखणे आज चाळीशीतही होताना दिसत आहे. गुडघेदुखी हा आर्थरायटिसचा म्हणजेच संधीवाताचा एक प्रकार आहे. गुडघ्याच्या आर्थरायटिसमध्ये गुडघ्याच्या ठिकाणी सूज येते आणि जीवघेण्या वेदना होतात.

उठताना आणि बसताना गुडघ्यातून कट- कट करून आवाज येत असेल आणि इतर कोणत्याही प्रकारची समस्या तुमच्या गुडघ्यांमध्ये नसेल तर तुम्ही नियमित हलका व्यायाम करून शकता. याबाबत तुम्हाला अभिनेत्री दिशा पाटनीच्या बहिणीने काही सोपे व्यायाम सांगितले आहेत, जे नियमित केले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आरामही मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात व्यायामाचे प्रकार.

खूशबूचा सल्ला काय?

अभिनेत्री दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी ही फिटनेस फ्रीक असून ती तिच्या सोशल मीडियावर फिटनेसशी संबंधित अनेक पोस्ट शेअर करत असते. यासोबतच ती लोकांना फिट राहण्यासाठी वर्कआउटचे सल्ले देखील देत असते. जर तुम्हालाही गुडघ्यातून कट- कट करून आवाज येण्याची समस्या असेल तर खुशबू पाटनी यांनी सांगितले हे व्यायाम करून पाहा.

खुशबू पाटनीच्या सल्ल्यानुसार तुम्हाला जर चालताना त्रास होत असेल आणि उठताना – बसताना किंवा पायऱ्या चढताना व उतरताना गुडघ्यातून कट- कट करून आवाज येत असेल तर रोज बॅकवर्ड रनिंग करा. त्याचबरोबर उलटे चालण्याचा सराव करा. सरळ धावण्यापेक्षा बॅकवर्ड रनिंगमध्ये स्नायूची वेगळी हालचाल होते. त्या व्यक्तीचे गुडघे मजबूत होऊ शकतात.

खुर्चीसारखं बसा

गुडघे मजबूत ठेवण्यासाठी खुशबू पाटनीने खुर्चीच्या स्थितीत बसण्याचे व्यायाम करण्याचा सल्ला दिलाय. तुम्ही भिंतीच्या साहाय्याने आपली पाठ सरळ ठेऊन आणि मग थोडं दोन्ही पायांमध्ये अंतर ठेऊन खाली सरकल्यास खुर्चीप्रमाणे बसल्याची स्थिती होईल. ही स्थिती कमीत कमी 30 सेकंद ठेवा. अशाने वेदना कमी होण्यास आणि गतिशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते.

खुशबूने लेग स्ट्रेचिंग करायलादेखील सांगितले आहे. लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि गुडघ्याच्या सांध्याभोवती कडकपणा कमी करण्यासाठी हा व्यायाम महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय खुशबूने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आणखी दोन व्यायाम सांगितले आहेत. जर तुम्हाला अशी समस्या असेल तर नियमित हे सोपे व्यायाम करता येतात. हे व्यायाम कसे करावेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.