World Hepatitis Day : जन्मत:च बाळाचे हेपेटायटीस बी लसीकरण केल्यास पेरिनेटल एचबीव्ही संक्रमणाची धोका कमी; वाचा कारणे!
World Hepatitis Day : पहिला डोस शक्यतो जन्माच्या 24 तासांच्या आत दिला जातो. एचबीव्ही पॉझिटिव्ह मातांसाठी, गर्भधारणेदरम्यान व्यवस्थापन, एचबीव्ही डीएनए व्हायरल लोड चाचणी आणि एचबीव्ही संसर्गाबाबत समुपदेशन आणि वैद्यकीय व्यवस्थापन आवश्यक असल्याची माहिती डॉ वजा यांनी दिली.
मुंबई: प्रसूतीपूर्व काळात मदर-टू-चाइल्ड ट्रान्समिशनमुळे होणारा हेपेटायटीस बी विषाणू (HBV) संसर्ग हा जगभरातील एक चिंतेचा विषय ठरत आहे. वेळोवेळी तपासणी करुन प्रोत्साहन देत या गंभीर समस्येला सामोरे जाणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे हेपेटायटीस बी लसीकरण करणे आवश्यक आहे. हेपेटायटीस लसीकरण केल्याने बाळांमधील (child) पेरिनेटल एचबीव्ही संक्रमणाचा धोका कमी होतो. जन्मावेळी बाळाचे सखोल मूल्यमापन, त्वरित उपचार आणि लसीकरण यकृताच्या रोगाचा सिरोसिस, हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा आणि घातक स्थितीशी संबंधित विकृती आणि मृत्यूची प्रगती थांबवतो. त्यामुळे बाळाचे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. आज जागतिक हेपेटायटीस दिन (world hepatitis day) आहे. त्यानिमित्ताने बाळ आणि गर्भवती महिलांमधील या आजाराच्या धोक्यांवर टाकलेला हा प्रकाश.
हेपेटायटीस हळूहळू सायलेंट किलर बनत आहे. मोठ्या संख्येने गर्भवती महिलांना एचबीव्हीचा त्रास होतो आणि हा आजार त्यांच्यामाध्यमातून मुलांनाही होऊ शकतो. एचबीव्ही बाधित आईच्या पोटी जन्मलेल्या 10 पैकी 1 बालकाला जन्माच्या वेळी एचबीआयजी आणि एचबीव्ही लस दिली असूनही एचबीव्हीची लागण होते. जरी लहान मुलांना जन्माच्या वेळी एचबीव्ही इम्युनोग्लोबुलिन (HBIg) आणि हिपॅटायटीस बी लस दिलेली असली तरीही लागण होत असल्याचे दिसून येते. जन्माच्या वेळी संसर्गाचे परिणाम गंभीर असतात. जन्मावेळी संसर्ग झालेल्या अनेक बाळांना सिरोसिस किंवा कर्करोगासारखे संक्रमण होण्याची भिती असते. एनोफोव्हिर डिप्रोव्हिंग फ्युमरेट हे एक अँटीव्हायरल औषध आहे, जे गरोदरपणाच्या तिमाहीत वापरले जाते. जे गर्भधारणेदरम्यान एचबीव्ही पॉझिटिव्ह असते, असे अपोलो स्पेक्ट्राच्या जनरल फिजिशियन डॉ. छाया वाजा यांनी सांगितलं.
संसर्गाची नियमित तपासणी आवश्यक
उपचार न केलेला हेपेटायटीस यकृताच्या कार्यावर परिणाम करून त्याचे नुकसान करेल. एखाद्याला निरोगी जीवन जगण्यासाठी यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असू शकते. त्यामुळे हेपेटायटीस बी विषाणू (HBV) संसर्गाची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. ज्यांना HBV होण्याचा धोका वाढतो. HBsAg स्थिती असलेल्या किंवा HBV संसर्गासाठी नवीन किंवा सतत जोखीम घटक असलेल्या महिलांची (उदा. इंजेक्शन ड्रग वापरणे किंवा लैंगिक संक्रमित संसर्गासाठी) रुग्णालयात दाखल करताना तपासणी केली पाहिजे. गर्भधारणेदरम्यान एचबीव्ही संसर्गाची तपासणी केल्याने महिलांना ओळखण्यात मदत होईल. ज्यांच्या अर्भकांना पेरिनेटल ट्रान्समिशनचा धोका आहे त्यांच्या पहिल्या जन्मपूर्व भेटीमध्ये HBsAg साठी चाचण्या मागवल्या पाहिजेत, असं अपोलो डायग्नोस्टिक, मुंबईचे सल्लागार पॅथॉलॉजिस्ट डॉ निरंजन नायक यांनी सांगितले.
आईकडून बाळाला संक्रमण
कोणत्याही प्रतिबंधात्मक उपचार न घेतलेल्या उच्च एचबीव्ही विषाणूजन्य संसर्ग असलेल्या मातांसाठी (किंवा एचबीईएजी पॉझिटिव्ह) 70 ते 90 टक्के आणि एचबीईएजी निगेटिव्ह असलेल्या मातांसाठी 70 ते 90 टक्क्यांपर्यंत मातेकडून बाळापर्यंत संक्रमण होण्याचा धोका असतो. मदर-टू-चाइल्ड ट्रान्समिशन (एमटीसीटी) रोखणे ही एचबीव्ही संसर्ग नियंत्रित करण्याची आणि गुंतागुंत कमी करण्याची गुरुकिल्ली आहे.
समुपदेशन आवश्यक
मदर-टू-चाइल्ड ट्रान्समिशनचे तीन मार्ग आहेत जे गर्भाशयात, प्रसूती दरम्यान आणि जन्मानंतर आईच्या संपर्कात असतात. शिवाय, गर्भाशयात आणि प्रसूती दरम्यान संक्रमण सामान्य आहे. गर्भधारणेदरम्यान मातांवर अँटीव्हायरल उपचार आणि प्रसूतीनंतर नवजात बालकांचे लसीकरण यासारखे उपाय उपयुक्त ठरू शकतात. 2009 पासून मदर-टू-चाइल्ड ट्रान्समिशन रोखण्यासाठी, डब्ल्युएचओने शिफारस केली आहे की, अर्भकाला एचबीव्ही लसीचे 3 ते 4 डोस मिळावे. ज्याचा पहिला डोस शक्यतो जन्माच्या 24 तासांच्या आत दिला जातो. एचबीव्ही पॉझिटिव्ह मातांसाठी, गर्भधारणेदरम्यान व्यवस्थापन, एचबीव्ही डीएनए व्हायरल लोड चाचणी आणि एचबीव्ही संसर्गाबाबत समुपदेशन आणि वैद्यकीय व्यवस्थापन आवश्यक असल्याची माहिती डॉ वजा यांनी दिली.