Health Tips : काकडी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे, जाणून घ्या माहिती

| Updated on: Sep 10, 2022 | 4:15 PM

काकडी ही शरीरासाठी फायदेशीर भाजी मानली जाते. मात्र ती खाण्याचे काही साईड-इफेक्टसही होऊ शकतात.

Health Tips : काकडी खाण्याचे हे आहेत फायदे आणि तोटे, जाणून घ्या माहिती
काकडी खाण्याचे 'हे' आहेत फायदे आणि तोटे
Image Credit source: Google
Follow us on

काकडीचे सेवन (Eating Cucumber) करणे हे शरीरासाठी फायदेशीर (good for health) मानले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यापासून ते अनेक पोषक तत्वांची प्राप्तता होण्यासाठी काकडी खाणे लाभदायक ठरते. काकडीमध्ये कॅलरी, फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडिअम इत्यादीचे प्रमाण कमी असते. जे आपल्या शरीरासाठी अनेक प्रकार फायदेशीर ठरते. काकडीचे सेवन केल्यामुळे शरीराला काय फायदे मिळतात हे जाणून घेण्यासाठी संशोधन करण्यात आले. त्यामध्ये असे आढळून आले की काकडीमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन डी यासारखी पोषक तत्वं (Nutrition) मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

मधुमेहापासून ते हृदय रोगापर्यंत आणि हाड मजबूत रहावीत याासाठी, काकडी खाणे आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरू शकते. याव्यतिरिक्त, काकडीमधील हायड्रेशन गुणवत्ता आपल्याला आतड्यांना निरोगी ठेवण्यास, बद्धकोष्ठता रोखण्यास, किडनी स्टोनपासून संरक्षण करण्यास मदत करते.

पण या सर्व फायद्यांव्यतिरिक्त, काकडी (benefits and side-effects of eating cucumber) खाण्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का ?

हे सुद्धा वाचा

काकडी खाण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत, हे जाणून घेऊया

काकडीमध्ये असतात अनेक पोषक तत्वं

आहार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडीमध्ये पाण्यासह फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि पोटॅशिअम सारखी पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असता.

याशिवाय काकडीमध्ये व्हिटॅमिन – बी, ए आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्सही मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला अनेक लाभ मिळू शकतात. फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्यांपासून ॲंटी-ऑक्सीडेंट्स शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.

अनेक आजारांमध्ये काकडी खाल्याने होतो फायदा

संशोधकांना असे आढळले आहे की, मधुमेह असलेल्या लोकांसाठी काकडी खाणे हा एक चांगला आहारातील पर्याय असू शकतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यापासून होणारा धोका रोखण्यात काकडी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.

यात असे पदार्थ आहेत जे रक्तातील साखर कमी करण्यास देखील मदत करू शकतात. त्याशिवाय काकडीमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असल्यामुळे ती हृदयरोगाच्या रुग्णांसाठी लाभदायक ठरते.

काकडी खाण्याचे तोटे

अधिक प्रमाणात काकडी खाल्याने रक्त गोठू शकते

संशोधकांच्या माहितीनुसार, काकडीमध्ये व्हिटॅमिन-के असणे हे खूप खास असते. मात्र जास्त प्रमाणात काकडी खाल्यास व्हिटॅमिन – के चे शरीरातील प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.

जे लोक रक्त पातळ होण्यासाठी औषधांचे सेवन करतात, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अधिक प्रमाणात काकडी खाऊ नये.

होऊ शकते ॲलर्जी

काकडी जास्त प्रमाणात खाल्याने काही लोकांनी ॲलर्जी झाल्याचे नमूद केले आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर तुम्हाला आधीपासूनच जळजळ, श्वास घेण्यास त्रास होणे असा त्रास होत असेल तर अशा परिस्थितीत काकडीचे अधिक सेवन धोकादायक ठरू शकते.

काकडी नेहमी ठराविक प्रमाणात खावी. त्याचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते.

(टीप – या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)