Stomach burning: योग्य आहारानंतरही होते पोटात जळजळ? हे असू शकते कारण
केवळ खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोट बिघडत नाही. इतर काही कारणांमुळेही तुमचं पोट, छाती आणि घशात जळजळ होऊ शकते.
अनेकदा अपुरी झोप, खराब दिनचर्या (lifestyle), जास्त मसालेदार पदार्थ खाणे, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या (food habits) सवयी यामुळे पोट बिघडण्याची किंवा जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. मात्र काही लोकांचे खाण्या-पिण्याचे रुटिन उत्तम असूनही त्यांना बऱ्याच वेळेस पोट आणि गळ्यात, घशात जळजळू लागते. केवळ खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोट बिघडत (stomach problem)नाही. इतर काही कारणांमुळेही तुमचं पोट, छाती आणि घशात जळजळ होऊ शकते. आरोग्याच्या काही समस्या, काही चुकीच्या सवयी, यामुळेही हा त्रास होऊ शकतो. त्यामागचे कारण काय व त्यावर काय उपाय करता येतील, हे जाणून घेऊया.
पोटात जळजळ होण्याचे कारण –
– गर्भावस्थेत (pregnancy) हार्मोन्समध्ये बदल होत असतात. हार्मोनल चेंजेसमुळेही पोटात जळजळ होऊ शकते. तसेच वाढलेले वजन किंवा लठ्ठपणामुळेही ही समस्या उद्भवू शकते. लठ्ठपणामुळे ओटीपोटावर दाब पडून वेदना (abdominal pain) व जळजळ होऊ शकते.
– जर तुम्हाला अस्थमा (asthma)असेल तर त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळेही तुमच्या पोटात जळजळू शकते. उच्च रक्तदाबाचा (high bp) त्रास असेल, तर त्यावेळी घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांमुळेही हा त्रास होऊ शकतो.
– तसेच ॲलर्जी, झोप, नैराश्य, बर्थ कंट्रोल, अनियमित मासिक पाळी यासाठी ज्या गोळ्यांचे सेवन केले जाते, त्यामुळेही पोटाता जळजळीचा त्रास होतो.
तुम्हालाही असा त्रास होत असेल, तर काही घरगुती उपायांनी थोडा आराम मिळू शकतो. मात्र त्याने, ती जळजळ पूर्णपणे बरी होऊ शकत नाही.
– तुमच्या पोटातही जळजळ होत असेल तर एक कप पाण्यात 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घालून, जेवायच्या अर्धा तास आधी हे पाणी प्यावे. तसेच कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळूनही पि शकता. या उपायांनी तुम्हाला जळजळीपासून थोडा आराम मिळेल. लिंबामध्ये ॲंटी-अल्सर इफेक्ट गुणधर्म असतात , ज्यामुळे अल्सर झाल्यास थोडा प्रभाव पडतो व आराम मिळतो.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )