घशात सतत खवखव झाल्यामुळे त्रासला आहात ? जाणून घ्या कारणे आणि उपाय
अनेक वेळा घशात होणारे इन्फेक्शन हे बऱ्याच काळापर्यंत त्रासदायक ठरू शकते. प्रदूषणाच्या लहान कणांमुळे श्वसनसंस्थेत समस्या निर्माण होऊ शकते.
घशात खवखव होणे, आवाज बसणे आणि जळजळ होणे हे सर्व सामान्य आहे, मात्र जेव्हा हा त्रास वारंवार होत असेल तर घशात इन्फेक्शन (infection)झालेले असण्याची शक्यता असते. प्रदूषण (pollution) आणि धुरामुळे घशात इन्फेक्शन अथवा संसर्ग होऊ शकतो. अनेक वेळा घशात (throat) होणारे इन्फेक्शन हे बऱ्याच काळापर्यंत त्रासदायक ठरू शकते. प्रदूषणाच्या लहान कणांमुळे श्वसनसंस्थेत समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे खोकला आणि अस्थमाचा त्रास वाढू शकतो.
घशात खवखव होत असेल तर आपला घसा हायड्रेटेड ठेवणे अत्यंत महत्वपूर्ण ठरते. त्याशिवाय गरम पेयांचे सेवन केल्यानेही घशाला आराम मिळू शकतो. काही घरगुती उपायांनीही घशातील खवखव कमी करता येऊ शकते. मात्र हे उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
ॲलर्जी – जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी होते, तेव्हा आपली प्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे इन्फेक्शन गळ्यापर्यंत पोहोचते. हेल्थलाइन नुसार, कोणताही खाद्य पदार्थ, झाडं, रोपं, पाळीव प्राण्यांचा कोंडा आणि धूळ या कारणांमुळे झालेल्या ॲलर्जीमुळे घशात खवखव होऊ शकते. ही एक कॉमन ॲलर्जी असते जी वातावरणातील अथवा हवामानातील बदलामुळे होऊ शकते.
पोस्ट नेझल ड्रिप – जेव्हा आपले शरीर अतिरिक्त श्लेष्मा तयार करण्यास सुरवात करते तेव्हा पोस्ट नेझल ड्रिप उद्भवते. या परिस्थितीत, घशातदेखील श्लेष्मा जाणवू शकतो. बर्याच वेळेस श्लेष्मा श्वासोच्छवासाचा मार्ग देखील बंद करते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ही समस्या सायनासायटिस आणि सर्दीमुळे होऊ शकते.
अशी घ्या काळजी –
– गरम पाण्याचे सेवन करावे.
– एअरप्युरिफायरचा वापर करावा.
– नोजल क्लीनरचा वापर करा.
– गरम पाण्याची वाफ घ्यावी.
– गरम पदार्थांचे सेवन करावे.
– मध आणि लिंबाचा रस घालून चहा प्यावा.
– मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
– श्लेष्मा स्वच्छ करावा.
– धूम्रपान करू नये.