Health: आयुष्याची शंभरी पार करण्याऱ्या लोकांमध्ये असतात ‘ या ‘ खास सवयी ! दीर्घायुष्यासाठी तुम्हीही बदलू शकता लाईफस्टाईल

जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीची लाईफस्टाइल जाणून घेऊया. कोणत्या सवयींमुळे ती व्यक्ती 100 हून अधिक वर्ष जगू शकली हे समजून घेऊया

Health: आयुष्याची शंभरी पार करण्याऱ्या लोकांमध्ये असतात ' या ' खास सवयी ! दीर्घायुष्यासाठी तुम्हीही बदलू शकता लाईफस्टाईल
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 3:17 PM

तुम्ही कधी हा विचार केला आहे का की, काही लोक 100 वर्षांपर्यंत कसे जगतात ? त्यांची लाईफस्टाइल (Lifestyle) कशी असते, कोणत्या सवयी असतात, ज्यामुळे त्यांना दीर्घायुष्य मिळते, ते काय आहार घेतात, हे माहीत आहे का ? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इथे आहे. दीर्घकाल  आयुष्य जगताना ते नक्की कसं असेल हे सांगणं थोडं कठीण ठरेल. पण ज्या व्यक्तीने 100 वर्षांपेक्षा अधिक आयुष्य जगलं आहे, त्यांनी कोणत्या चांगल्या सवयी (Good habits for long life) स्वीकारल्या होते. त्यांच्या इतक्य दीर्घायुष्याचे नेमके रहस्य काय हे जाणून घेता येईल. जगातील सर्वात वृद्ध महिला ल्युसिल रँडन (Lucile Randon) यांचे वय आहे 118 वर्ष. त्यांचं जीवन कसं आहे, काय सवयी त्यांनी अंगिकारल्या हे जाणून घेऊया.

100 वर्षांहून अधिक जगणाऱ्या लोकांच्या सवयी –

सिस्टर ॲंड्रे –

जपामनमधील कने तनाका यांच्या मृत्यूनंतर फ्रेंच नन असणाऱ्या ल्युसिल रँडन, ज्यांना सिस्टर ॲंड्रे (Sister Andre) या नावानेही ओळखले जाते, त्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. सिस्टर ॲंड्रे यांचे वय 118 वर्ष आहे. त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी, 1904 रोजी झाला होता. त्यांनी पहिले व दुसरे महायुद्धही पाहिले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, सिस्टर ॲंड्रे आजही सकाळी 7 वाजता उठतात. त्याशिवाय त्यांना चॉकलेट खाणं आणि रेड वाईन पिणं खूपच आवडतं.

हे सुद्धा वाचा

कने तनाका –

जपानमधील कने तनाका (Kane Tanaka) यांचे निधन याच वर्षी म्हणजे 2022 सालच्या एप्रिल महिन्यात झाले. त्यांचे वय 119 वर्ष इतके होते आणि जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती होत्या. त्यांच्या सवयी म्हणजे त्या खूप पाणी पित असत व त्यांना कॉफीही खूप आवडत होती. तसेच त्यांना चॉकलेट खायलाही खूप आवडायचे. त्यांच्या आहारात भात, फिश आणि सूप यांचा समावेश होता. या वयातही त्या रोज सकाळी 6 वाजता उठायच्या.

दीर्घायुष्य जगणाऱ्यांच्या सवयी –

– जे लोक दीर्घायुष्य जगतात, त्यांना सकाळी लवकर उठायची सवय असते. – योग्य आणि पौष्टिक आहार, ही दीर्घायुष्याची एक गुरुकिल्ली आहे. – दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने , पुरेशा प्रमाणात पाणी पीत राहिले पाहिजे. – जंक फूड किंवा फास्ट फूड पासून दूर रहावे. – धूम्रपान करणे टाळावे.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.