AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर संजीवनी नाही, तर उलट दुष्परिणा, वाचा काय आहे ‘सेवाग्राम पॅटर्न’

रेमडेसिवीर शिवाय कोरोना रुग्णांना बरे करणारा खास सेवाग्राम पॅटर्न काय आहे. वाचा सविस्तर...

कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर संजीवनी नाही, तर उलट दुष्परिणा, वाचा काय आहे 'सेवाग्राम पॅटर्न'
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 6:45 AM

वर्धा : “मागील वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात झाला आहे. दरम्यानच्या कालावधीत कोरोनासाठी अनेक औषधींचा प्रायोगिक उपयोग झाला. त्यामध्ये रेमडेसिवीर हे मुख्य औषध आहे. पण, ते औषध प्रभावशाली ठरल्याचे सिद्ध झालेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालात ही बाब सिद्ध झाली आहे. गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्यांना रेमडेसिवीरचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात,” असे मत वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालचे अधीक्षक डॉ. एस. कलंत्री यांनी व्यक्त केले (Know all about special Sevagram pattern to treat corona without Remdesivir).

डॉ. कलंत्री म्हणाले, “रेमडिसीवर देऊन मृत्यूदर, दवाखान्यातील जाण्याची वेळ, व्हेंटीलेटरवर जाण्याची वेळ टळत नाही. कोरोनाबद्दल भिती निर्माण झाली आहे. कोरोनाकरीता रेमडीसीवर म्हणजे संजीवनीच चित्र निर्माण झाले आहे. मात्र हे औषध रामबाण असल्याची भावना शास्त्रीय दृष्टीकोनातून योग्य नाही. सेवाग्राम रुग्णालयात शास्त्रीय दृष्टीकोनातून औषधी देताना विचार केल्या जातो. रेमडीसीवरचा गाजावाजा झाला आहे. त्यात आशेच स्थान निर्माण झाले आहे. भितीमुळे रेमडीसीवरचा काळाबाजार, तुटवडा होत आहे. सौम्य आजार, ऑक्सिजनची कमी नसलेल्यांना सेवाग्राम रुग्णालयात रेमडेसिवीर देत नाही. ज्यांना खरच फायदा होईल, त्यांनाच रेमडीसीवर रिजर्व केले आहे.”

“अनेक जण रेमडेसिवीर न घेताही बरे झाले”

“अनेक जण रेमडेसिवीर न घेताही बरे झाले असल्याचा अनुभव आहे. रेमडेसिवीर देण्यापूर्वी किडनी, लिव्हर चांगले असणे आवश्यक आहे. लिव्हर खराब असेल, किडनी काम करत नसेल, डायलिसीस लागत असेल, ट्रान्सप्लँट झालेले असेल, गंभीर स्वरूपाचे हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीर दिल्याने तोटे होतात, प्रतिकूल परिणाम होतात. हृदयावरही प्रतिकूल प्रभाव होत असल्याचे पेपर प्रसिद्ध झाले आहेत. सर्वांगीण विचार करुन रेमडेसिवीर द्यायला हवे,” असंही डॉ. कलंत्री यांनी सांगितलं.

“10 दिवसांचा कोर्स केल्यास 30 टक्के मृत्यूदर कमी”

“कोरोनाकाळात अनेक औषधांचा प्रयोग होत आहे. सौम्य लक्षण असलेल्यांनाही अनेक औषधी देतात. ऑक्सिजन पातळी कमी झालेल्यांना, दवाखान्यात आलेल्यांना स्टिरॉईड म्हणजे डेक्सामिथासोन प्रभावी आहे. दहा दिवसांचा कोर्स केल्यास 30 टक्के मृत्यूदर कमी होतो. डेक्सामिथासोन, टॉसीलीझीमॅप आणि चांगली काळजी घेतली तर इतर औषधींचा प्रभाव दिसत नाही. भितीमुळे अशी परिस्थिती निर्माण असावी. उपचार पद्धती शास्त्रीय असायला हवी,” असंही डॉ. कलंत्री यांनी नमूद केलं.

जिल्ह्यात मागील 15 दिवसात आलेला रेमडेसिवीरचा साठा आणि कोणत्या रुग्णालयाकडून किती वापर झाला याचा आढावा खालीलप्रमाणे,

  • 16 एप्रिलपासून जिल्हा प्रशासनाला 3318 रेमडेसिवीर इंजेक्शन प्राप्त.
  • यापैकी 1678 इंजेक्शनचं वाटप रुग्णालयात करण्यात आलं, तर 1640 इंजेक्शन जिल्हा प्रशासनकडे शिल्लक.

16 मार्चपासून रुग्णालय निहाय वापरण्यात आलेले इंजेक्शन

  • आचार्य विनोभा भावे रुग्णालय सावंगी ( मेघे) – 1100 इंजेक्शन
  • महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस , सेवाग्राम – 100 इंजेक्शन
  • जिल्हा सामान्य रुग्णालय,वर्धा – 68 इंजेक्शन
  • उपजिल्हा रुग्णालय ,हिंगणघाट – 246 इंजेक्शन
  • उपजिल्हा रुग्णालय , आर्वी – 75 इंजेक्शन
  • अरिहंत क्रिटिकल केयर हॉस्पिटल, हिंगणघाट – 60 इंजेक्शन

जिल्ह्यात सर्वाधिक सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयात रुग्ण असताना सुद्धा सेवाग्राम येथे रेमडीसीवर इंजेक्शन वापरण्यास टाळल्या जात आहे

हेही वाचा :

कोरोनाचे नियम मोडताय, दंड न भरल्यास प्रशासन थेट मालमत्तेवर बोजा चढवणार

स्ट्रेचर, व्हिलचेअर न मिळण्याइतपत आरोग्य यंत्रणा कोलमडली, वर्ध्यात महिलेने आयसोलेशन कक्षापर्यंत जाण्याआधीच श्वास सोडला

Wardha Corona and Curfew Update | वर्ध्यात नियम आणखी कठोर, आता दुपारी 2 वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवा सुरु

व्हिडीओ पाहा :

Know all about special Sevagram pattern to treat corona without Remdesivir

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.