Corona Virus : जाणून घ्या कोरोनाव्हायरस तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम करतो?

कोविड पॅनक्रिएटिक बीटा पेशींवर परिणाम करू शकतो, जे इन्सुलिन तयार करतात. ACE-2 रिसेप्टर्स इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींचे नुकसान करतात. यामुळे इन्सुलिनची कमतरता होते आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. (Know how coronavirus affects your blood sugar levels)

Corona Virus : जाणून घ्या कोरोनाव्हायरस तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम करतो?
जाणून घ्या कोरोनाव्हायरस तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम करतो?
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 7:03 AM

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला आहे. दररोज कोरोनाच्या केसेसमध्ये वाढ होत आहे. मृत्यूचा आलेख सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार हायपरग्लायकेमिया ग्रस्त(हाय ब्लड शुगर) असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा धोका 30 टक्के अधिक असतो. जर आपण देखील या समस्येने ग्रस्त असाल तर आपल्याला निश्चितपणे त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय माहित असणे आवश्यक आहे. (Know how coronavirus affects your blood sugar levels)

रक्तातील साखरेचे प्रमाण किती असते?

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना मॅक्स हॉस्पिटलमधील एन्डोक्रिनोलॉजी डायबेटिस अँड ऑबसीटीचे प्रधान संचालक डॉ. सुरजित झा म्हणाले, देशातील जवळपास 10-13 टक्के लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आपण घराबाहेर जाऊ शकत नाही. या सर्वांमुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. शरीरात कोणत्याही प्रकारच्या तीव्र संक्रमणामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होऊ शकते. चांगला आहार, उच्च ताप आणि इतर कारणांमुळे कोविड संसर्गाच्या वेळी रक्तातील साखरेची पातळी वाढते.

नवी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलचे एन्डोक्रिनोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. एसके वांगणू म्हणाले की, आपण मधुमेहाने ग्रस्त आहोत की नाही हे जाणून घेणे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. रक्तातील साखरेची पातळी जरुर तपासून पहा. कोविड पॅनक्रिएटिक बीटा पेशींवर परिणाम करू शकतो, जे इन्सुलिन तयार करतात. ACE-2 रिसेप्टर्स इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींचे नुकसान करतात. यामुळे इन्सुलिनची कमतरता होते आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

मधुमेहाची तपासणी महत्त्वपूर्ण आहे का?

डॉ. झा पुढे म्हणाले की, SARS-CoV-2 विषाणूची चाचणी करणार्‍या लोकांसाठी मधुमेह तपासणी महत्त्वपूर्ण आहे. ते पुढे म्हणाले की, पॉझिटिव्ह चाचणी करणाऱ्या 5 वर्षाच्या मुलाचीही ही चाचणी करून घ्यावी कारण यामुळे उपचारांना मदत होईल.

हाय बल्ड शुगर लेवलचे संकेत आणि लक्षणे

जर एखाद्या रुग्णाची चाचणी कोविड-19 पॉझिटिव्ह असेल तर हाय ब्लड शुगरची लेवल शोधणे सोपे नाही, म्हणूनच ब्लड शुगर लेवलच्या सरासरी पातळीचे स्पष्ट चित्र मिळण्यासाठी ब्लड शुगर लेवल चाचणीसह एचबीए 1 सी(HbA1c) चाचणी करुन घेणे चांगले.

हाय ब्लड शुगर लेवल कशी नियंत्रित करणार?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना हाय ब्लड शुगरचा त्रास आहे आणि ज्यांना कोरोना झाला आहे त्यांनी कोविड रिकव्हरी कालावधीत ब्लड शुगर लेवलवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो. (Know how coronavirus affects your blood sugar levels)

इतर बातम्या

5G बाबत अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, सरकारचे कडक कारवाईचे आदेश

आजी-माजी गृहमंत्र्यांची गुप्तभेट! वळसे-पाटील आणि अनिल देशमुखांमध्ये काय चर्चा?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.