Honey Benefits : रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध खाल्यास मिळतील ‘हे’ फायदे !

मधामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्यामध्ये कॉपर, आयर्न (लोह), फॉस्फोरस, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम सारखी तत्वे असतात. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध खाल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Honey Benefits : रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध खाल्यास मिळतील 'हे' फायदे !
रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध खा !Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 10:04 PM

मध (Honey) हा अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट असतो. त्यामध्ये अनेक पोषक तत्वे (Nutrition) असतात. ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून (Health Problems) आपले संरक्षण करण्याचे कार्य करतात. मधाचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळल्याने वजन कमी होण्यासही मदत होते, असे म्हणतात. मध हा त्वचेसाठीही चांगला ठरतो. मधामध्ये कॉपर, आयर्न (लोह), फॉस्फोरस, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम सारखी तत्वे असतात.

रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. तुम्ही एक चमचा मध दूध किंवा पाण्यासह सेवन करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी मध खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊया.

खोकल्याचा त्रास होतो दूर

रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्याने खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो. मधात ॲंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे कफ दूर होण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध पाण्यासोबत सेवन करावा.

हे सुद्धा वाचा

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

मधामध्ये ॲंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असताात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात. मधामुळे संसर्गापासून बचाव होतो. हे फायदे हवे असतील तर रात्री झोपण्यापूर्वी दुधासह एक चमचा मधाचे सेववन करावे. त्याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.

त्वचा निरोगी राहते

मधामुळे त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन करू शकता. मध आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे कार्य करतो. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते. तसेच तुमचा रंगही उजळतो.

मध केस वाढवण्यासाठी ठरते उपयुक्त

मधात ॲंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे केसांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते. मधाचे सेवन केल्याने केस लवकर वाढवतात. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मधाचे सेवन करावे. तसेच मधापासून तयार केलेला हेअर मास्कही तुम्ही केसांसाठी वापरू शकता.

वजन कमी करण्यात सहाय्यक

मधामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते असे म्हणतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह मधाचे सेवन तुम्ही करू शकता. त्यामुळे चरबी कमी होते. अशा प्रकारे मधाचे सेवन केल्यास जलदरित्या वजन कमी होण्यास मदत होते.

घशातील खवखव कमी होते

घसा खवखवण्याचा त्रास होत असेल तर ती समस्या दूर करण्यासाठी एक चमचा मधात आल्याचा थोडा रस मिसळून तुम्ही त्याचे सेवन करू शकता. यामुळे घशातील खवखव कमी होईल व तुम्हाला आराम मिळेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.