Benefits Of Sleeping Early : रात्री लवकर झोपल्यामुळे मिळतात ‘हे’ फायदे

बहुतांश लोकांना रात्री झोपताना मोबाईल बघण्याची सवय असते. मात्र त्यामुळे झोपेची क्वॉलिटी खराब होते व नीट झोप लागत नाही. परिणामी दिवसभर चिडचिड होत राहते. शांत व पुरेशी झोप आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे.

Benefits Of Sleeping Early : रात्री लवकर झोपल्यामुळे मिळतात 'हे' फायदे
रात्री लवकर झोपल्यामुळे मिळतात 'हे' फायदे Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 5:41 PM

‘लवकर नीजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य-धनसंपदा लाभे’, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजेच जे लोक रात्री लवकर झोपतात (sleeping early at night) व सकाळी लवकर उठतात, त्यांना चांगले आरोग्य (Good Health) आणि संपत्ती मिळते, असा त्याचा अर्थ होतो. मात्र आजकाल बिझी लाईफस्टाइलमुळे लोकांची झोप पूर्ण होत नाही. बरेच जण रात्री उशीरा झोपतात व सकाळी लवकर उठावे लागते. त्यामुळे झोप पूर्ण होत (sleep problem) नाही. बहुतांश लोकांना रात्री झोपताना मोबाईल बघण्याची सवय असते.

सोशल मीडियावर तासनतास घालवले जातात. परिणामी रात्री झोपायला उशीर होतो, झोपेची क्वॉलिटी खराब होते व नीट झोप लागत नाही. त्यामुळे दिवसभर चिडचिड होत राहते, थकल्यासारखं वाटतं, खूप ताण येतो, कामावरही परिणाम होतो. थोडक्यात काय तर अपुऱ्या झोपेचा मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होते. म्हणूनच चांगल्या आरोग्यासाठी शांत व पुरेशी झोप आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे. रात्री लवकर न झोपण्याचे काय परिणाम होतात, जाणून घेऊया…

वजन वाढू शकते

एका अभ्यासानुसार, झोप पूर्ण न झाल्यास तुमचे वजनही वाढू शकते. त्यानुसार, तुम्ही जितके कमी झोपाल, वजन कमी करणे तितकेच कठीण होत जाईल. अपुऱ्या झोपेमुळे तुमचे वजन वाढूही शकते. त्यामुळे वेळेवर झोपावे. पुरेशी झोप आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

हे सुद्धा वाचा

रोगप्रतिकारक शक्ती कमी होते

पुरेशी झोप न झाल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता. हे टाळायचे असेल तर पुरेशी व शांत झोप घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. व तुम्हाला व्हायरल किंवा इतर संसर्गाशी लढण्यात मदत मिळते.

आजारी पडणे

नीट झोप न झाल्यास तुम्हाला मधुमेह, स्ट्रोक किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक ठरते. त्यामुळे जुनाट आजारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकेल.

व्यक्ती सकारात्मक राहते

रात्री झोप नीट न झाल्यास तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे वाटते, चिडचिड होत राहते तसेच तणावही जाणवतो. बऱ्याच वेळेस तुम्ही अनेक गोष्टींबद्दल नकारात्मक विचार करता. मात्र तुमची झोप नीट, पूर्ण झाली असेल तर तुम्ही दिवसभर फ्रेश राहता, उर्जा मिळते व सकारात्मक विचार मनात येतात.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.