फायदे माहित आहेत, आज काजू खाण्याचे तोटे वाचा!
तुम्हाला माहित आहे का की काजूचे जास्त सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते. होय, काजूमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असल्याने काजू जास्त प्रमाणात खाणे टाळावे. काजूच्या अतिसेवनामुळे आरोग्याला कोणते तोटे होतात हे ही तुम्हाला माहिती असायला हवं.
मुंबई: सुक्या मेव्याच्या बाबतीत काजूचे नाव प्रथम येते. तो स्वयंपाकघरातील एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. तसे काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर हे खाल्ल्याने त्वचा ही निरोगी राहते. पण तुम्हाला माहित आहे का की काजूचे जास्त सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते. होय, काजूमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असल्याने काजू जास्त प्रमाणात खाणे टाळावे. काजूच्या अतिसेवनामुळे आरोग्याला कोणते तोटे होतात हे ही तुम्हाला माहिती असायला हवं.
काजू खाण्याचे तोटे
लठ्ठपणा वाढतो
काजूमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा, रक्तातील साखरेची उच्च पातळी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मधुमेह आणि थायरॉईडच्या रुग्णांनी काजू खाऊ नये. जर तुम्ही आधीच लठ्ठ असाल तर काजू खाणे टाळावे.
किडनी स्टोन
काजूमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे काजूच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. अशावेळी जर तुम्हाला आधीच किडनीची समस्या असेल तर काजू टाळावे. कारण काजूचे सेवन केल्याने ही समस्या वाढू शकते.
डिहायड्रेशन होऊ शकते
काजूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जास्त फायबर खाल्ल्यानंतर कमी पाणी प्यायल्यास डिहायड्रेशन होऊ शकते. कारण फायबर व्यवस्थित विरघळण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जेव्हा शरीरात जास्त फायबर असते तेव्हा ते शरीरात असलेले पाणी शोषून घेते. यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्याही सुरू होतात.
फुफ्फुसांशी संबंधित समस्या
काजूमध्ये लोह असते. लोहाचे जास्त सेवन केल्याने पेशींच्या कामावर परिणाम होतो. लोह पेशींमध्ये साठवले जाते. जर ते फुफ्फुसांच्या पेशींमध्ये जमा झाले तर. त्यामुळे दम्याची लक्षणे दिसू शकतात. त्या व्यक्तीला श्वास घेणे कठीण होते.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)